उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने संगमनेर मध्ये मोटर सायकल रॅली
◻️ उद्धव ठाकरे यांचा ही मोटर सायकल रॅलीमध्ये सहभाग
◻️ ठाकरेंनी मानले उपस्थित शिवसैनिकांचे आभार मानले
संगमनेर LIVE | संगमनेर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने उद्धव ठाकरे यांची बुधवारी जाहीर सभा घेण्यात आली यावेळी संगमनेर येथील मार्केट यार्ड समोर शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक व माजी शहरप्रमुख अमर कतारी यांच्यावतीने भव्य अशा मोठ्या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे संगमनेर शहरातील मार्केट या ठिकाणी आगमन होताच शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला व अमर कतारी यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट यार्ड ते संगमनेर बस स्थानक या ठिकाणी पर्यंत भव्य अशी मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या मोटरसायकल रॅलीमध्ये उद्धव ठाकरे यांनी सहभाग घेतल्याने शिवसैनिकांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झाली.
त्यानंतर उद्धव ठाकरे सह मोटरसायकल रॅली बस स्थानक येथील संवाद दौऱ्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी उपस्थित सर्व शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले व मार्गदर्शन केले. तसेच येत्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा महाराष्ट्रभर फडकवायचा आहे यासाठी निर्धार करा अशा सूचनाही केल्या. महाविकास आघाडीचे नेते बाळासाहेब थोरात, शरद पवार यांचे देखील कौतुक ठाकरे यांनी केले.
यावेळी शिवसेना माजी शहर प्रमुख अमर कतारी व माजी तालुका प्रमुख भाऊसाहेब हासे यांनी उद्धव ठाकरे यांना चांदीची गदा देऊन त्यांचा सत्कार केला.
या रॅलीमध्ये जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, युवा सेना जिल्हा समन्वयक फैसल सय्यद, उपजिल्हाप्रमुख वैभव अभंग, युवा सेना शहर प्रमुख गोविंद नागरे, माजी तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, युवा सेना तालुकाप्रमुख अक्षय गुंजाळ, उपशहर प्रमुख अक्षय गाडे, वाहतूक सेना शहर प्रमुख इम्तियाज शेख, दीपक साळुंखे, रहीम बेग, विनगोपाल लाहोटी, अक्षय गुंजाळ,
अमित फटांगरे, अक्षय बिलाडे, अमोल डुकरे, संभाव लोढा, विजय सातपुते, सागर भागवत, शरद कवडे, बाळू कवडे, प्रशांत खजुरे, अमित फटांगरे, योगेश खेमनर, इरफान सय्यद, योगेश खेमनर, एकनाथ खेमनर, गुलाब कोकाटे, गणेश धात्रक, रंगनाथ फटांगरे, सदाशिव हासे, कैलास नवले, पंकज पडवळ, सोनू रोडे, बाळू कवडे, भीमा अनाप, मुकेश काटे, माधव फुलमाळी, महिला आघाडीचे रेणुका शिंदे, शितलताई हासे, आशाताई केदारी आदी शिवसैनिक महिला पदाधिकारी उपस्थित होते.