निळवंडेचा राजकारणासाठी उपयोग करणारे महायुती सरकारमुळे उघडे पडले - अमोल खताळ
◻️ पालकमंत्री विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी
◻️ पाणी माझ्यामुळे आले असे भासवणाऱ्याना कालव्याची काम पूर्ण करता का आली नाहीत
◻️ आनंदोत्सव साजरा करीत धांदरफळ मध्ये जलपूजन संपन्न!
संगमनेर LIVE | निळवंडे धरणाचा ४० वर्ष स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी वापर करून शेतकऱ्यांची फसवणूक करणार्यांना महायुती सरकारने उघडे पाडले आहे. गेली अनेक वर्ष चातका प्रमाणे निळवंडे कालवा मधून पाण्याची वाट पाहाणार्या शेतकऱ्याना महायुती सरकारने पाणी मिळवून दिले असल्याचे प्रतिपादन संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी केले.
राज्यात महायुती सरकार आल्यानंतर पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे निळवंडे धरणाच्या डाव्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय झाला. उजव्या कालव्यातून धांदरफळ मध्ये पाणी पोहचल्याचा आनंद ग्रामस्थ आणी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.
याप्रसंगी बोलताना म्हणाले की, सन १९९५ व २०१५, २०२२ मध्ये महायुती सरकार सतेवर आल्यानंतर खऱ्या अर्थाने निळवंडे धरण व कालव्यांच्या कामाला चालना मिळाली. तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ आणि ना. विखे पाटील यांचा पुढाकार यामुळेच कालव्याची काम होवू शकली. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या खर्चास सुधारीत प्रशासकीय मान्यता महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे मिळाली. धरण व कालवा यासाठी केंद्र व राज्य सरकारचा निधी मिळवून दिला म्हणून आज हा सोन्याचा दिवस पाहण्याचे भाग्य संगमनेर तालुक्याला मिळाले असल्याचे अमोल खताळ यांनी ठामपणे सांगितले.
जिरायत भागाला पाणी मिळून शेतकरी सुखी व्हावा यासाठी स्व. माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील, स्व. खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून योगदान दिले. पण सर्वकाही आम्हीच केले आणि पाणी माझ्यामुळे आले असे भासवणाऱ्याना कालव्याची काम पूर्ण करता का आली नाहीत हे सुध्दा जनतेला एकदा सांगितले पाहीजे असे आवाहन अमोल खताळ यांनी दिले.
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे जल पूजन करून हा प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यात आला. यामुळे अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील १८२ गावांमधील ६८८७८ हेक्टर (१ लाख ७० हजार २०० एकर) शेतजमिन ओलिताखाली येणार आहे. सिन्नर तालुक्यातील ६ गावांमधील २६१२ हेक्टर शेतजमीन वगळता अहमदनगर जिल्ह्यातील ६६२६६ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येण्यास मोठी मदत होणार असल्याचे स्पष्ट त्यांनी स्पष्ट केले.
उजव्या कालव्याच्या कार्यक्षेत्रात येणार्या नांदुरी दुमाला, मिर्झापूर, धांदरफळ खुर्द, निमज येथील भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ यांनी केलेल्या विनंती वरून उजव्या कालव्याच्या जल पूजनसाठी संजय निराधार योजना संगमनेर तालुका अध्यक्ष अमोल खताळ पाटील, जेष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ, रोहिदास साबळे, सोमनाथ नेहे, कचरू पाटील वलवे, वाल्मिक शिंदे, सलीम शेख, याच्यासह उपस्थित राहून स्थानिक ग्रामस्थासह जल पूजन केले. त्यावेळेस फटाके, डी. जे., ढोल पथक, पेढे वाटून शेतकऱ्यांनी आनंद साजरा केला. गावागावातील जेष्ठ शेतकरी, महिला यांच्या हस्ते साडी, नारळ, फुले वाहून जल पूजन करण्यात आले.
नांदुरी दुमाला येथे डी. जे.समोर शेतकऱ्यांनी नाचून आनंद साजरा केला. सोमनाथ नेहे, संजय कवडे, संदीप शेटे, सूर्यभान शेटे, संपत साबळे, मुरलीधर कवडे, भाऊसाहेब नेहे, सुमन शेटे, सौ. कल्पना नेहे, सागर नेहे, किरण नेहे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. मिर्झापूर येथील कचरू वलवे, अनिल निळे, नवनाथ निळे, सौ. सरूबाई भालके, सौ. सुमन वलवे, सौ. संगीता वलवे, सौ. शांता वलवे सह शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धांदरफळ खुर्द, गोडसेवाडी येथील जलपूजन यादव बाबा देवगिरे (बिरोबा देवस्थान) यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सोमनाथ खताळ, संपत खताळ, भाऊसाहेब खताळ, संदीप खताळ, कैलास गोडसे, उमेश कोकणे, नितीन खताळ, ज्ञानेश्वर खताळ, विशाल खताळ, विठ्ठल गोडसे, मीननाथ खताळ , सुदाम शिरतार, ज्ञानदेव शिरतार, भागवत खताळ, गोकुळ खताळ, नवनाथ निळे, विजय गुंजाळ, पंडित कोकणे, सौ. प्रतिभा खताळ, सौ. आशा खताळ, सौ. अनिता खताळ, सौ.मनीषा खताळ सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निमज येथे बाच्छाव गुंजाळ, गोरख डोंगरे, अशोक डोंगरे, दशरथ गुंजाळ, पुंजा डोंगरे, शशिकांत मतकर, भास्कर कासार, भाऊसाहेब मतकर, कैलास बिबवे, रोहिदास महाराज गुंजाळ, सहादू गुंजाळ, भास्कर कासार, साहेबराव गुंजाळ, दगडू शेख, बालासाहेब कासार, उत्तम गुंजाळ, रामनाथ शिंदे, अकबर शेख, एकनाथ डोंगरे, सौ. विमल डोंगरे, सौ. स्वाती गुंजाळ, सौ. प्रियांका गुंजाळ, सौ. दीपा गुंजाळ, सौ. शशिकला गुंजाळ सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.