देवावर श्रद्धा ठेवा परंतू अंधश्रद्धेला बळी पडू नका - सौ. शालिनीताई विखे पाटील
◻️ आश्वी खुर्द येथे साध्वी पुंजाआई पुण्यतिथीनिमित्त त्रिदिनी सप्ताह उत्साहात संपन्न
संगमनेर LIVE | महाराष्ट्र ही साधू संताची भुमी असून संतांचे पाऊल नगर जिल्ह्याला लाभल्यामुळे आपला जिल्हा भाग्यवान ठरला आहे. तुम्ही डॉक्टर व्हा, वकील व्हा, बॅरिस्टर व्हा! परंतु आपल्या जीवनाची वाटचाल सुरु ठेवताना देवावर श्रद्धा ठेवा परंतू अंधश्रद्धेला बळी पडू नका. असे आवाहन जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे साध्वी पुंजाआई पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सौ. विखे बोलत होत्या. यावेळी ह. भ. प. दत्तगिरी महाराज, जेष्ठ नेते अण्णासाहेब भोसले, सरपंच सौ. अलका बापूसाहेब गायकवाड, अॅड. अनिल भोसले, कांचनताई मांढरे, अँड. रोहिणीताई निघते, माजी उपसरपंच संजय गायकवाड, मोहित गायकवाड, कैलास गायकवाड, संतोष भडकवाड, विकास गायकवाड, ह.भ.प. सुनील महाराज पवार, ह. भ. प. कल्याण महाराज काळे आदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौ. विखे पुढे म्हणाल्या की, प्रामाणिकपणा, निष्ठा आणि सहनशीलता हे साध्वी पुंजाआई मातेने आपल्याला दाखवून दिले आहे. आश्वी खुर्द ग्रामस्थांनी कोणताही भेदभाव न करता सुंदर असा त्रिदिनी सप्ताहा आयोजित केल्याबद्दल ग्रामस्थाचे त्यानी कौतुक केले. विखे पाटील परिवार हा वारकरी संप्रदायाचा असल्याचे सांगून याठिकाणी भक्तीच्या शक्तीपुढे नतमस्तक होऊ असे सौ. विखे म्हणाल्या आहेत.
दरम्यान यावेळी तीन दिवस पारायणासाठी बसलेल्या ५२ महिलांना विकास गायकवाड यांनी स्वखर्चाने ५२ साड्यांचे सौ. विखे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वाटप केले. यानंतर ह. भ. प. सुनील महाराज पवार यांचे काल्याचे अमृततुल्य किर्तन व उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी बापूसाहेब गायकवाड, मकरंद गुणे, म्हाळू गायकवाड, बाळासाहेब मांढरे, मनोज मेहरे, हभंप बाळु महाराज पडुंरे, बाबासाहेब भोसले, दीपक सोनवणे, देविदास वाळेकर, प्रा. संजय देशमुख, हभंप सचिन महाराज गायकवाड, दगडू गायकवाड, युन्नुस सय्यद, प्रवीण दातीर, अँड. प्रशांत गव्हाणे, मनोज कहार, कृष्णा भंडारे, उमेश सालकर, शरद सोनवणे, शिवाजी गायकवाड, विशाल गव्हाणे, विनोद गव्हाणे, राजेंद्र पडुंरे, नारायण कहार, संपत गायकवाड, गणेश भडकवाड, सागर भडकवाड, विकास भडकवाड, रमेश भालेराव, सागर रातडीया, सोपान सोनवणे, तुषार सोनवणे आदिसह दाढ, आश्वी आदिसह जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साध्वी पुंजाआई पुण्यतिथी सोहळ्याच्या पहिल्या दिवशी ह. भ. प. कर्नाल महाराज व देवगड देवस्थानचे महंत प्रकाशनंदगिरीजी महाराज यांनी भेट दिली. यावेळी त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यानंतर साध्वी पुंजाआई मातेच्या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच दुसऱ्या दिवशी अश्विन ग्रामीण रुग्णालयाने आयोजित केलेल्या मोफत सर्वरोग निदान शिबिराचा २०० नागरीकानी लाभ घेतला. यावेळी महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम देखील करण्यात आला.