माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा
◻️ राज्यातील कॉग्रेस मधील धुसफूस चव्हाट्यावर
संगमनेर LIVE | माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
आपल्या लेटरहेडवर नावासमोर असलेल्या विधानसभा सदस्य या पदासमोर, पेनाने माजी असे त्यांनी लिहिले आहे. म्हणजेच त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देण्यापूर्वी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याची शक्यता आहे.
अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
'मी दिनांक १३/०२/२०२५ च्या मध्यान्हापासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करत आहे,' असं पत्र अशोक चव्हाण यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले आहे. त्यामुळे कॉग्रेस मध्ये मोठी खळबळ उडाली आहे.