काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची वाढदिवसानिमित्त पुस्तक तुला

संगमनेर Live
0
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची वाढदिवसानिमित्त पुस्तक तुला

◻️ मतिमंद व मूकबधिर विद्यार्थ्यासमवेत वाढदिवस

संगमनेर LIVE | मानवता हाच खरा धर्म आहे. प्रत्येकाचा आदर करणे ही आपली संस्कृती आहे. मतिमंद व मूकबधिर विद्यार्थी हे विशेष विद्यार्थी असून त्यांच्या विकासासाठी संग्राम मतिमंद विद्यालयाच्या माध्यमातून अत्यंत चांगले काम होत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली असून या विद्यार्थ्यांसमवेत त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला.

डॉ. देवेंद्र ओहरा निवासी मतिमंद विद्यालयात आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक तुला करण्यात आली. यावेळी समवेत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात,अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, डॉ. नामदेवराव गुंजाळ, राणी प्रसाद मुंदडा, डॉ. माणिकराव शेवाळे, डॉ. मच्छिंद्र घुले, डॉ. सुचित गांधी, सूर्यकांत शिंदे, बापूसाहेब गिरी, सूर्यकांत शिंदे, मुख्याध्यापक सुनील कवडे, चांगदेव खेमनर, मिलिंद आवटी, तुषार गायकर आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात यांनी मतिमंद व मूकबधिर विद्यालयांशी संवाद साधत त्यांच्या समवेत वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी आमदार थोरात म्हणाले की, मतिमंद व मूकबधिर विद्यार्थी हे विशेष विद्यार्थी असतात. त्यांची काळजी घेणे आणि जीवन घडवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संग्राम मतिमंद व मूकबधिर विद्यालय ही आदर्शवत ठरले आहे. कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रत्येक मुलाची काळजी घेतली जात आहे. हे होणारे काम ही परमेश्वराची सेवा आहे. संगमनेर तालुक्याला वैचारिक अधिष्ठान असून येथील राजकारण, समाजकारण, सुसंस्कृतपणा हा देशाला आदर्शवत आहे. संगमनेर हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र बनले असून आदिवासी, गोरगरीब, मतिमंद व मूकबधिर या सर्व विद्यार्थ्यांसाठी चांगल्या सुविधांसह चांगले शिक्षण देण्याचे काम होत असल्याचे ते म्हणाले.

माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल बनला आहे. याचबरोबर शैक्षणिक आणि मेडिकल हब सुद्धा झाले आहे. आमदार थोरात यशवंतराव चव्हाण यांचे समृद्ध वारसदार असून ते पुस्तक प्रेमी आहेत. त्यांचा वाचनाचा व्यासंग मोठा आहे. वाचन संस्कृती रुजवण्यासाठी जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून काम केले जात असून त्यांच्या वाढदिवस निमित्ताने पुस्तकतुला व मतिमंद विद्यालयात समवेतचा आनंद सर्वांना प्रेरणा देणारा ठरणारा असल्याचेही ते ही म्हणाले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब नरोडे यांनी केले तर संग्राम संस्थेचे उपाध्यक्ष सूर्यकांत शिंदे यांनी आभार मानले.

अमृतवाहिनी बँकेकडून 1 लाख रुपये देणगी..

संग्राम मतिमंद व मूकबधिर विद्यालयासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेने एक लाख रुपयाचा धनादेश देणगी म्हणून आमदार बाळासाहेब थोरात व मा. आमदार डॉ तांबे यांच्या हस्ते चेअरमन सुधाकर जोशी यांनी विद्यालयाला सुपूर्त केला आहे. या प्रसंगी अमृतवाहिनी बँकेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. या देणगी बद्दल विद्यालयाच्या वतीने अमृतवाहिनी बँकेचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !