उद्यापासून शिवभक्त पुंजाआई मातेच्या पुण्यतिथीनिमित्त त्रिदिनी सप्ताहाला सुरवात
◻️ श्री श्री रामदास स्वामी कर्नाल महाराज व महंत प्रकाशनंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते ‘प. पू. पुंजाआई महात्म’ या ग्रंथाचे होणार प्रकाशन
◻️ आश्वी खुर्द येथे २९ व्या पुण्यतिथीनिमित्त तीन दिवस भक्तीचा जागर
संगमनेर LIVE (आश्वी) | शिवभक्त पुंजाआई मातेच्या पुण्यतिथीनिमित्त आश्वी खुर्द (ता. संगमनेर) येथे उद्या शुक्रवारी दि. ९, शनिवार दि. १० व रविवार दि. ११ फेब्रुवारी या काळात त्रिदिनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या शुक्रवार दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी पुंजाआई मातेच्या मुर्तीचा अभिषेक केला जाणार आहे. यानंतर श्री श्री रामदास स्वामी कर्नाल महाराज व श्री क्षेत्र देवगड देवस्थानचे महंत प्रकाशनंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते ‘प. पू. पुंजाआई महात्म’ या ग्रंथाचे प्रकाशन केले जाणार आहे. यावेळी प्रवचन व महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. दुपारी पारायण वाचन व हरिपाठ तसेच सायंकाळी शिवशाहीर कल्याण महाराज काळे यांचे सुश्राव्य हरी किर्तन व त्यानंतर उपस्थिताना महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
शनिवार दि. १० फेब्रुवारी रोजी सकाळी पारायण वाचन व त्यानंतर मांचीहिल येथील अश्विन ग्रामीण आयुर्वेद रुग्णालयाकडून मोफत सर्वरोग निदान शिबिर संपन्न होणार आहे. सायंकाळी ह.भ. प. सचिन महाराज गायकवाड यांचे किर्तन व त्यानंतर महाप्रसाद वाटप केला जाणार आहे.
रविवार दि. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी पारायण वाचणं यानंतर महिलांसाठी हळदी - कुंकू वृक्ष वाटप कार्यक्रम पार पडणार आहे. सायंकाळी ४ वाजता महंत दत्तगिरी महाराज यांच्या हस्ते मिरवणूक व हरिपाठ पार पडणार असून त्यानंतर ह. भ. प. सुनील महाराज पवार यांचे अमृततुल्य काल्याचे किर्तन व महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
दरम्यान या त्रिदिनी सप्ताहासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उत्सव समिती व आश्वी खुर्द ग्रामस्थांनी केले आहे.