आश्वी येथे उद्या ‘आचार्य सम्राट आनंदॠषीजी महाराज जैन धर्म स्थानकाचे’ लोकार्पण!
◻️“नारी सन्मान सेवा” समारंभाचे आयोजन
आश्वी (योगेश रातडीया) | ‘राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदॠषीजी महाराज जैंन धर्म स्थानक आश्वी बुद्रुक (ता. संगमनेर) उद्घाटन आणि नारी सेवा सन्मान समारोहाचे उद्या शनिवार दि. १६ मार्च रोजी सकाळी ९ वाजता आयोजन करण्यात आल्याची माहीती जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुमतीलाल गांधी यांनी दिली आहे.
यावेळी राष्ट्रसंत प. पु. कमलेश मुनीजी महाराज, सुनंदाजी महाराज, किर्तीसुधाजी महाराज, प. पु. श्री. कैवल्यरत्नजीश्रीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याप्रसंगी दानवीर भामाशाहा रमणलाल कपुरचंद लुंकड, अॅड. शाळीग्राम होडगर, नंदकुमार भटवेरा, अजित कुंकलोळ, प्रफुल्ल बोगावत, सुमतीलाल भंडारी, नवीन मुनोत, प्रकाश भंडारी, जयश्री चंगेडीया, लताबाई गुंदेचा, चंचलबाई गांधी, उषाबाई संकलेचा, सतिष लोढा, अशोक बोरा, कमलेश भंडारी, पेमराज बोथरा, आदेश चंगेडीया, सुभाष सावज, डाॅ. अशोक लोढा, डाॅ वसंत लोढा, डाॅ. सुवर्णा गोलेच्छा, सुवालाल लुंकड, रमेश गुंदेचा, अनिल पिपाडा, संजय कटारीया, अनिल पिपाडा, अनिल लोढा, शिरीष दर्डा, दिलीप पारख, वसंत फिरोदिया, राजकुमार गांधी, विनोद गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
दरम्यान या भव्य उद्घाटन समारंभाला तालुका व जिल्ह्यातील जैन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आश्वी जैंन श्रावक संघाच्या वत्तीने करण्यात आले आहे.