प्रवरा उजव्या कालव्यात बुडून शिबलापूर येथील २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू
संगमनेर LIVE (आश्वी) | शिबलापूर येथील संतोष बबन मुन्तोडे (वय - २१) या तरुणाचा प्रवरा उजव्या कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे.
बुधवार दि. २२ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आश्वी खुर्द (ता. संगमनेर) शिवारातून जाणाऱ्या प्रवरा उजव्या कालव्यात एक मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर रमेश रतन मुन्तोडे यांनी याबाबतची माहिती पोलिसांना कळल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान यानंतर उत्तरणीय तपासणीसाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला होता. तर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.