अखेर.. दहावीच्या निकालाची प्रतिक्षा संपली!
◻️ महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून तारीख जाहीर
संगमनेर LIVE | नुकताच बारावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. आता दहावीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. २७ मे रोजी दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. निकालाची तारीखही पुढे आली असून २७ मे २०२४ रोजी दहावीचा निकाल हा दुपारी एक वाजता लागणार आहे.
राज्यात दहावीची परीक्षा १ मार्च ते २६ मार्च २०२४ यादरम्यान पार पडली. विशेष म्हणजे या परीक्षेची तयारी बोर्डाकडून जय्यत प्रकारे करण्यात आली. यंदा १६ लाख ९ हजार ४४४ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिलीये. आता विद्यार्थ्यांनी निकालाची प्रतिक्षा संपली आहे.
mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in या साईटवर जाऊन विद्यार्थी दहावीचा निकाल पाहू शकतात. अगोदर ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाईल, त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळेल. बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारलीये. आता दहावीच्या निकालात कोण बाजी मारते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.