होत्याचं झालं नव्हतं ; हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात शेकडो गावरान कोंबड्या ठार!
◻️ शिबलापूर येथील घटना ; शेतकऱ्यांचे अंदाजे दीड लाखाचे नुकसान
संगमनेर LIVE (आश्वी) | शिबलापूर शिवारातील राजेंद्र दिनकर घुगे या शेतकऱ्यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये असलेल्या शंभरपेक्षा जास्त गावरान कोंबड्या हिंस्त्र प्राण्याने केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या आहेत. ही घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली.
संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील राजेंद्र दिनकर घुगे हे आश्वी - शिबलापूर रस्त्यालगत असलेल्या शेतात आपल्या कुटुबांच्या उदरनिर्वाहाकरिता बऱ्याचं वर्षापासून कुक्कुटपालनाचा व्यवसाय करत आहेत. त्यासाठी त्यांनी शेजारी शेडमध्ये शंभरपेक्षा जास्त गावरान कोंबडयाचे पालनपोषण करत होते.
दहा ते बारा दिवसानी या कोंबड्याची विक्री केली जाणार होती. मात्र शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे घुगे शेडमध्ये गेले असता, सर्वच्या सर्व कोंबड्या मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांनी तत्काळ ही माहिती संरपच प्रमोद बोंद्रे, वनरक्षक हरिचंद्र जोजर व पशुवैद्यकिय आधिकारी शिवाजी फड यांना कळवली होती.
तर या घटनेतील मृत कोंबड्याचा पंचनामा करण्यात आलेला नाही. घटनास्थळी वनरक्षक यांनी भेट दिली मात्र पशु आधिकऱ्यांनी भेट न दिल्यामुळे मृत कोंबड्या दिवसभर ठेवून अखेर उशिरा पंचनाम्याविनाचं मृत कोंबड्याची विल्हेवाट लावण्यात आली. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान या घटनेत कुक्कुटपालक राजेंद्र घुगे यांचे अंदाजे दीड लाख रुपये असे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने त्यांना भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिक पदाधिकारी आणि नागरिकांनी केली आहे.