आश्वी इंग्लिश स्कूलकडून एचएससीत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
संगमनेर LIVE (आश्वी) | २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या एचएससी परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या आश्वी बुद्रुक (ता. संगमनेर) येथील आश्वी इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. यावेळी विज्ञान शाखेचा शंभर टक्के तर कला शाखेचा ९०.६२ टक्के निकाल लागला आहे.
यावर्षी विज्ञान शाखेतून वैष्णवी सुर्यभान होडगर हिने ७५.८३ टक्के गुण मिळवून प्रथम, जिनेषा अभिजित गांधी हिने ७४.६७ टक्के गुण मिळवून द्वितीय तर संस्कृती अरुण भागवत हिने ७१.३३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.
कला शाखेतून पुजा अनिल सांगळे हिने ७५.१७ टक्के गुण मिळवून प्रथम, वर्षा अनिल कदम हिने ७३. ५० टक्के गुण मिळवून द्वितीय तर पायल चंद्रकांत शेळके हिने ६४ .५० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
दरम्यान एचएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य जे. आर. बर्डे, पर्यवेक्षिका श्रीमती एस. एन. लोखंडे तसेच स्थानिक स्कूल कमिटी सह विविध समित्या व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.