गुणवंत विद्यार्थ्यानमुळे शाळेच्या नावलौकिकात भर - योगेश रातडीया
◻️सात्रळ येथील आनंद गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा शंभर टक्के निकाल
◻️ गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव सोहळा संपन्न
संगमनेर LIVE (आश्वी) | ग्रामीण भागातील मुलांना अल्प अश्या फी मध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने लावलेल्या सात्रळ (ता. राहुरी) येथील आनंद गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. यावर्षीही इयत्ता दहावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा शाळेने कायम ठेवली आहे. त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यानी शाळेच्या नावलौकिकात भर टाकली असल्याची प्रतिक्रिया संस्थेचे विश्वस्त योगेश रातडीया यांनी दिली आहे.
यामध्ये सोनगाव पंचक्रोशीतील विद्यालयात प्रथम आलेली आनंद गुरुकुलची विद्यार्थीनी साक्षी कडु हिच्यासह गुणवंत विद्यार्थ्याचा सन्मान व गुणगौरव सोहळ्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. प्रगती पतसंस्थेचे व्यवस्थापक सुनील ताजणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कार्यक्रमावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कांतीलाल बोरा, विश्वस्त योगेश राताडिया, डॉ. राहुल बोरा यांनी गुलाब पुष्प व शालेय साहित्य देउन मुलांचा सन्मान केला. यावेळी इयत्ता दहावीच्या वर्गाला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचाही देखील सन्मान करण्यात आला. शाळेच्या प्राचार्य अर्चना प्रधान यांनी आपल्या मनोगतातून मुलांच्या वाटचालीचा आढावा घेतला. तसेच डाॅ. कांतीलाल बोरा आणि विश्वस्त योगेश रातडीया यांनी मनोगत व्यक्त केले.
दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता व्यास यांनी केले तर आभार कविता जोर्वेकर यांनी मानले. याप्रसंगी सतिष वाणी, दिलीप कडु, असिफ शेख यांच्या सह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.