अवघ्या ११ महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण करणाऱ्या तिघाना अटक

संगमनेर Live
0
अवघ्या ११ महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण करणाऱ्या तिघाना अटक

◻️ चिमुकल्याची सुटका ; लोहमार्ग पोलीसाची कामगिरी

◻️ आरोपींमध्ये संगमनेरच्या एकाचा तर पारनेर तालुक्यातील दोघांचा समावेश 

संगमनेर LIVE | अहमदनगर रेल्वे स्टेशन येथील मेन गेट समोरील लिंबाखाली बसलेल्या २३ वर्षीय महिलेशी एका अनोळखी महिलेने ओळख वाढवली. त्या महिलेच्या बाळाच्या जेवणासाठी वरणभात घेऊन येते असे सांगून त्या अनोळखी महिलेने बाळाला पळवून नेल्याबाबत अहमदनगर लोहमार्ग पोलीस ठाणे येथे गुरंन ६९/२०२४ नुसार कलम ३६३ भादंवी नुसार गुन्हा दाखल केला होता.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपनिरीक्षक संजय लोणकर यांनी चौफेर तपासाची सुत्रे फिरवली. तपासादरम्यान गुन्ह्यातील आरोपी हे सुपा परिसरात असल्याची गुप्त माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. त्यामुळे मोठ्या शिताफीने पोलीसानी या आरोपींना ताब्यात घेतले. अनिल जाधव (रा. सुपा, ता. पारनेर), नवनाथ धोत्रे (रा. गुंजाळवाडी, ता. संगमनेर) तसेच एका महिलेला अटक करून ११ महिन्याच्या बाळाची त्यांच्या तावडीतून सुटका केली आहे.

दरम्यान ही कारवाई लोहमार्ग पुणेचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी, उपविभागीय पोलीस अधिकारी महेश देवीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय लोणकर, पोलीस हवालदार सर्फराज खान, बाळासाहेब गवळी, पोलीस नाईक इरफान शेख, पोलीस शिपाई रवींद्र देशमुख, अविनाश खरपास, आसाराम येवले, किरण तोरडमल, प्रकाश गडाख, गोरख नवले, महिला पोलीस शिपाई वनिता समीदर, मंगल आहेर, होमगार्ड साबिर शेख, मंदार सटाणकर यांनी केली. तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय लोणकर हे करत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !