ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची संगमनेर तालुका कार्यकारणी जाहीर
◽आश्वी खुर्द ग्रामपंचायतचे कर्मचारी आदिनाथ जाधव उपाध्यक्षपदी
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची पंचायत समिती सभागृह येथे नुकतीच बैठक पार पडली. यावेळी अध्यक्षपदी बबन सांगळे, कार्याध्यक्षपदी बाळासाहेब शिंदे, तसेच आश्वी खुर्द ग्रामपंचायतचे कर्मचारी आदिनाथ जाधव व बाबाजी खरात यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
पंचायत समिती सभागृहात झालेल्या बैठकीवेळी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा नगर जिल्हाध्यक्ष दिलीपराव डिके, नाशिक विभागीय सचिव तथा जिल्हा सचिव आत्माराम घुणे, जिल्हा कार्याध्यक्ष तथा राहुरी तालुका अध्यक्ष रामदास ससाने, जिल्हा उपाध्यक्ष संतोष नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेची जम्बो कार्यकारणी निवडण्यात आली. याप्रसंगी माजी तालुका अध्यक्ष विलासराव दिघे यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी सर्वानुमते अध्यक्षपदी बबन सांगळे, कार्याध्यक्षपदी बाळासाहेब शिंदे, उपाध्यक्षपदी आदिनाथ जाधव व बाबाजी खरात, सचिव रमेश तांबे, सह सचिव गणेश बोखारे, संघटक संजय गुंजाळ, महिला प्रतिनिधी कांचन वर्पे, दिपाली मते, सोनाली तळपे, कार्यकारी सदस्य म्हणून गौतम सोनवणे, बिपिन मेने, अण्णासाहेब खेमनर, निळू काशीद, गोरख कोटकर, दत्तू पानसरे, असलम पठाण, चक्रधर राऊत, बाळासाहेब सांगळे, गणेश साबळे, शरद गफले, गोविंद वाकळे, बाळासाहेब भालेराव, नितीन बागुल, योगेश इले, संभाजी शेळके, प्रभाकर पवार, संदीप गुंजाळ, विकास रुपवते, सुनील वाडेकर, संतोष सागर आदिंची कार्यकारणी जाहिर करण्यात आली.
दरम्यान सर्व नुतन पदाधिकारी यांचे संघटनेच्या प्रमुखासह ग्रामस्थांनी देखील अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.