‘लाडक्या बहिणींना पैसे नको, सुरक्षा द्या!’ ; महिलांची जोरदार घोषणाबाजी

संगमनेर Live
0
‘लाडक्या बहिणींना पैसे नको, सुरक्षा द्या!’ ; महिलांची जोरदार घोषणाबाजी 

◻️ गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सपशेल अपयशी - अमर कतारी

◻️ संगमनेर येथे शिवसेनेकडून (उबाठा) बदलापूर येथील घटनेचा निषेध

संगमनेर LIVE | ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे घडलेल्या अमानवी घटनेचा संगमनेर येथील शिवसेना महिला आघाडी व शिवसैनिकांच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी नराधमाला फाशी देण्याच्या मागणी सोबतच पीडितांना न्याय देण्यास विलंब करणाऱ्या गृहखात्याचा धिक्कार करण्यात आला. तसेच महिलांनी ‘पंधराशे नको न्याय द्या’ ‘लाडक्या बहिणींना पैसे नको सुरक्षा द्या’ अश्या घोषणा देखील दिल्या आहेत.

यावेळी अमर कतारी म्हणाले की, गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे सपशेल अपयशी ठरत असून त्यांच्या काळात कोपर्डी प्रकरण ते नवी मुंबई प्रकरण घडले आणि आत्ताच बदलापूर येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. यावेळी पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली तक्रार नोंदवून घेण्यास दिरंगाई केली? संबंधित संस्थाचालक कोणत्या पक्षाचे आहेत? बदलापूर येथिल आंदोलकांवर लाठीचार्ज का करण्यात आला असे अनेक प्रश्न उपस्थित करत फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी शिवसैनिक कतारी यांनी केली.

जिल्हाप्रमुख खेवरे, महिला संपर्क प्रमुख बेबीताई लांडगे, विधानसभा संपर्क प्रमुख सूर्यकांत शिंदे यांच्या .  आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले. आरोपीला फाशी देण्याची मागणी तालुका प्रमुख शीतलताई हासे, उपजिल्हा प्रमुख आशाताई केदारी, शहर प्रमुख संगीता गायकवाड, उपतालुका प्रमुख रेणुका शिंदे, वैशाली वडतंल्ले यांच्या वतीने करण्यात आली व तसें निवेदन शहर पोलीस स्थानकाला देण्यात आले. 

यावेळी महिला आघाडीच्या पदाधिकारी सोबत शिवसेना माजी शहर प्रमुख अमर कतारी, माजी तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, युवा युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, शहर प्रमुख गोविंद नागरे, युवा सेना जिल्हा समन्वयक फैसल सय्यद, पथ विक्रेता सदस्य दीपक साळुंखे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख वैभव अभंग, आरोग्य सेना जिल्हाप्रमुख अजीज मोमीन, उपशहर प्रमुख वेणुगोपाल लाहोटी, दीपक वन्नम, 

समन्वयक अक्षय बिल्लाडे, अमोल डुकरे, भाई शेख, प्रकाश गायकवाड, शरद कवडे, समन्वयक आसिफ तांबोळी, निलेश गुंजाळ, अक्षय गाडे, अल्ताफ शेख, इमरान सय्यद, इरफान सय्यद, प्रशांत खजुरे, अनिल खुळे, त्रिलोक कतारी, संकेत घोडेकर, रोमन सय्यद, नारायण पवार, प्रकाश चोथवे, माया राठोड, वर्षा मंडलिक, रंजना पवार, लक्ष्मी तिची, सुगरिता खीची, काजल राठोड, भाऊसाहेब बोराडे, सदाशिव हासे, विलास शेळके आदी शिवसैनिक उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !