उंबरी बाळापूर येथे साई चरित्र पारायण सोहळ्याला भाविकाची मांदियाळी!
◻️ शिवचरित्रकार ह.भ.प. दौलत महाराज बोडखे यांच्या काल्याच्या किर्तणाने होणार सोहळ्याची सांगता
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या मार्गदर्शनाखाली साई श्रद्धा प्रतिष्ठानच्या वतीने साई चरित्र पारायण सोहळ्याचे सोमवार दि. ५ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट २०२४ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये भाविकांसाठी सोमवारी मंगलचरण साई समर्थ अवतरण कथा, मंगळवारी साई महिमा वर्णन आणि ब्रम्हज्ञान कथा, बुधवारी साई बाबांचे शिर्डीत आगमन व चाॅद पाटील विवाह सोहळा, गुरुवारी गुरु महिमा वर्णन व बाबांची चावडी मिरवणूक, शुक्रवारी उदी महिमा व हुंडी वर्णन, शनिवारी साई निर्वाण, साई कृपा, अनुग्रह व दान आणि रविवारी पालखी सोहळा तसेच कथा समापन पार पडणार आहे.
सोमवार दि. १२ ऑगस्ट रोजी सकाळी साई प्रतिमेची मिरवणूक काढली जाणार आहे. यानंतर शिवचरित्रकार ह.भ.प. दौलत महाराज बोडखे (आळंदी) यांचे सुश्राव्य असे काल्याचे किर्तन पार पडणार आहे. दरम्यान दररोज सायंकाळी पार पडणाऱ्या या सोहळ्याला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून सोमवारी होणाऱ्या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन साई श्रद्धा प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.