आश्वी खुर्द येथील कॉग्रेसच्या तीन कार्यकर्त्याचा भाजपात प्रवेश
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील कॉग्रेसच्या तीन कार्यकर्त्यानी महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भाजपात प्रवेश केला. यामध्ये दत्तात्रय किसन मांढरे, विजय दत्तात्रय मांढरे आणि संकेत गपले यांचा समावेश आहे.
भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचनताई मांढरे यांनी या तिघांचा भाजप पक्षात प्रवेश घडवून आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. आश्वी खुर्द जनसेवा मंडळाच्या सर्व जेष्ठ व तरुण कार्यकर्त्यानी या तिघांचे पक्षात स्वागत केले आहे. यावेळी जेष्ठ नेते अण्णासाहेब भोसले, बाळासाहेब मांढरे, कांचनताई मांढरे, अनिल भोसले आदिंसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.