अभिनेते प्रसाद भागवत ‘कलारत्न’ पुरस्काराने सन्मानित!
◻️ दाढ बुद्रुकच्या तरुणाने मराठी चित्रपट सृष्टीत दिलेल्या योगदानाचा गौरव
संगमनेर LIVE | राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथील रहिवासी आणि मराठी चित्रपट सृष्टीत विविध भूमिकासह दिग्दर्शन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अभिनेते प्रसाद सुनंदा त्र्यंबक भागवत यांना नुकताच ‘कलारत्न अमृत गौरव पुरस्कार २०२४’ हा प्रदान करण्यात आला आहे.
प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र शासन यांच्याकडून नुकताच ‘प्रजासत्ताक अमृत गौरव सोहळा २०२४’ चे मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते.
अभिनेते प्रसाद सुनंदा त्र्यंबक भागवत यांनी १९९९ मध्ये कला क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. जाणता राजा आणि शिवपुत्र शंभुराजे या दोन महानाट्यात त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. यानंतर पावनखिंड, संघर्ष योध्दा, भाऊचा धक्का या मराठी चित्रपटात महत्वाची भूमिका केली आहे. तर कर्मयोगी आबासाहेब हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
मुंबई येथे आयोजित पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक डॉ. बाळासाहेब तोरस्कर होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समितीचे उपाध्यक्ष आणि साहित्यिक डॉ. ख. रं. माळवे यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रीय विज्ञान संस्था भारत सरकारचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. डी. जी. यादव, नासाचे शास्रज्ञ डॉ. डेरिक एंजल्स, संपादक डॉ. सुकृत खांडेकर, मुख्याध्यापक भानुदास केसरे, ग्रंथालय सचिव प्रमोद महाडिक, ग्रिन्डलेज फार्मास्युटिकलचे चेअरमन रामकृष्णन कोळवणकर, वित्त व्यवस्थापक राजेश कांबळे, वुमेन्स इंडिपेंडेन्सच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. नॅन्सी अब्लुकर्क मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान कार्यक्रमाचे स्वागत पर भाषण नागेश हुलवळे यांनी केले असून पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर भागवत यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.