मंत्री विखे पाटील यांच्या प्रयत्नातून श्रीराम मंदिरासाठी २० लाख रुपये निधी मंजूर
◻️ आश्वी खुर्दच्या लोकनियुक्त सरपंच अलका गायकवाड यांची माहिती
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील ऐतिहासिक प्रभु श्रीराम, श्री दत्त आणि प. पू. पुंजाआई माता यांच्या संयुक्त मंदिर जिर्णोद्धारासाठी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून २० लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ. अलका बापूसाहेब गायकवाड यांनी दिली.
आश्वी खुर्द येथे ऐतिहासिक व पुरातन प्रभू श्रीराम, श्री दत्त आणि प. पु. पुंजाआई माता यांचे संयुक्त मंदिर आहे. या मंदिराचा जिर्णाध्दार व्हावा अशी मागणी गेली दोन वर्षापासून ग्रामस्थ व भाविक करत होते. यासंदर्भात आश्वी ग्रामस्थांकडून नामदार विखे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा देखील सुरू होता.
त्यामुळे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषद मा. अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या विशेष पुढाकारातून आणि महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. यामध्ये २५/१५ योजनेअंतर्गत श्रीराम मंदिर सभामंडपासाठी दहा लाख रुपये तसेच डोंगरी विकास निधी योजनेतर्गत श्री दत्त मंदिर सभा मंडपासाठी दहा लाख रुपये निधी मंजूर झाला. तर लवकरच या मंदिर जिर्णाध्दाराचे काम सुरू होणार आहे.
या कामासाठी गावातील ज्येष्ठ, तरुण, धार्मिक क्षेत्रातील सर्व मंडळी यांनी एकत्र येऊन सर्वोतोपरी योगदान देण्याचा मानस व्यक्त केला आहे. येथील युवा आर्किटेक्चर हितेश सोपान सोनवणे यांनी अतिशय सुंदर असे मंदिराचे रेखाचित्र तयार केले असून या मंदिरात प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, श्री दत्त यांच्या भव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणारा आहे. तसेच गावच्या आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या प. पू. पुंजाआई मातेचा देखील मोठा गौरव याचं मंदिरात केला जाणार आहे.
दरम्यान विखे पाटील कुटुंबांने मंदिर जिर्णोद्धारासाठी निधी मंजूर केल्याबद्दल जेष्ठ नेते अण्णासाहेब भोसले, प्रवरा बँकेचे जेष्ठ संचालक बापुसाहेब गायकवाड, कारखान्याचे संचालक डॉ. दिनकर गायकवाड, भाजपच्या महिला जिल्हा अध्यक्षा सौ. कांचनताई मांढरे, लोकनियुक्त सरपंच सौ. अलका बापूसाहेब गायकवाड, उप सरपंच बाबा भवर, सेवा सोसायटीचे चेअरमन शिवाजी सोनवणे, व्हा. चेअरमन सुनील भवर, देवालय ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, उपाध्यक्ष सिद्धार्थ देशवंडीकर, दूध संस्थेचे चेअरमन मकरंद गुणे, व्हा. चेअरमन अविनाश सोनवणे,
बाळासाहेब मांढरे, प्रशांत कोडोलिकर, सोपान सोनवणे, सागर भडकवाड, विजय गायकवाड, देविदास वाळेकर, दिग्विजय देशमुख, ज्ञानेश्वर खर्डे, दत्ता गायकवाड, विठ्ठल वर्पे, मोहन गायकवाड, सुभाष ठमाजी गायकवाड, हभप मोहनबाबा गायकवाड, माणिक गायकवाड, दिलीप मांढरे, संपत गायकवाड, सचिन महाराज भडकवाड, हौशिराम गायकवाड, सुभाष भोसले, अशोक यवले, निलेश भवर, सुयोग सोनवणे, डॉ. सचिन क्षिरसागर, राजेंद्र सातपुते, भास्कर वाल्हेकर, प्रदिप वाल्हेकर, लक्ष्मण सातपुते, विठ्ठल मोरे, देवराम शिंदे, रमेश सिनारे, सुनिल मांढरे आदिनीं आभार मानले आहेत.
आश्वी खुर्द गावच्या विकासासाठी विखे पाटील कुटुंबाने नेहमी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. शिर्डी मतदारसंघाचे भाग्यविधाते महसूलमंत्री ना. विखे यांनी गावच्या मंदिर जिर्णाध्दारासाठी २० लाख रुपये निधी मंजूर केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे जेष्ठाच्या मार्गदर्शनाखाली तरुणांना सोबत घेऊन प्रभु श्रीराम यांच्या सुंदर मंदिराची उभारणी करणार असल्याची प्रतिक्रिया पद्मश्री डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अँड. अनिल भोसले यांनी दिली