उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी शिवसैनिक सरसावले
◻️ संगमनेर येथे ४ ते ११ सप्टेंबर दरम्यान भगवा सप्ताहाचे आयोजन
संगमनेर LIVE | शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ४ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर दरम्यान संगमनेर येथे भगवा सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रभर भगवा सप्ताह निमित्त विविध सामाजिक उपक्रम घेण्यात येत आहे. शिवसेना घराघरात पोहोचवण्याचे काम देखील सुरू असताना संगमनेर तालुक्यात मात्र असं काहीच घडत नसल्याने प्रामाणिक शिवसैनिक अस्वस्थ होते. शिवसैनिक म्हणून उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसैनिक पुढे सरसावले असून भगवा सप्ताह निमित्त पक्षाची सभासद नोंदणी अभियान सुरू केले आहे.
यासाठी संगमनेर मधील सर्व पदाधिकारी तसेच शिवसैनिक एकत्रित आले आहेत. शिवसेना, शेतकरी सेना, युवा सेना, महिला आघाडी, रिक्षा सेना, वाहतूक सेना, ग्राहक संरक्षण कक्ष, आरोग्य सेना, व्यापारी आघाडी या सर्व पदाधिकारी व माजी पदाधिकारी यांनी मिळून शहरातील बस स्थानक जवळ शिवसेना सभासद नोंदणी अभियान सुरू केले.
सकाळी १० वाजता सुरू झालेल्या अभियानात दुपारी ०३ वाजेपर्यंत ५०० सभासद नोंदणी फार्म भरण्यात आले सभासदांना लगेचच सभासद कार्ड लॅमिनेशन करून देण्यात आले. शिवसेना सदस्य नोंदणी अभियान शिवसेनेचे संपर्कप्रमुख जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, संपर्क संघटिका बेबीताई लांडगे, व शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले.
नागरिक युवक व्यापारी व्यावसायिक शेतकरी बांधव यांचा सभासद नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे एकाच दिवसात ५०० सभासद नोंदणी करण्यात आली. याबाबत पक्षाचे वरिष्ठ संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे, विश्वनाथ नेरूळकर व जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी शिवसैनिकांचे व सभासद नोंदणी उपक्रमाचे कौतुक केले.
सकाळी शिवसेनेच्या संपर्क संघटिका बेबीताई लांडगे यांच्या हस्ते नवीन सभासदांना शिवसेना सभासद नोंदणीचे कार्ड वाटप करून सदस्य नोंदणीस सुरुवात करण्यात आली. शिवसेनेच्या सदस्य नोंदणीस प्रतिसाद बघता महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल व महाविकास आघाडीचे सरकार येईल असा विश्वास सूर्यकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेनेचे महिला संपर्क प्रमुख बेबीताई लांडगे, माजी शहर प्रमुख अमर कतारी, माजी तालुका प्रमुख भाऊसाहेब हासे, युवासेना जिल्हा प्रमुख अमित चव्हाण, संघटक असिफ तांबोळी, विजु सातपुते, विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, वाहतूक सेना शहर प्रमुख ईम्तायज शेख, जिल्हा समन्वयक फैसल सय्यद, पठार भाग तालुका युवा प्रमुख योगेश खेमनर, व्यापारी सेना शहर प्रमुख संभव लोढा, तालुका संघटक राजु सातपुते, शेतकरी सेनेचे पंकज पडवळ, आरोग्य सेना जिल्हा प्रमुख अजिज मोमिन, स्वप्निल उंदावत,
समन्व्यक दिपक सांळुखे, उप तालुका प्रमुख एकनाथ खेमनर, युवासेना शहर प्रमुख गोंविद नागरे, नारायण पवार, मुन्ना शिकिलकर, मुस्तकिन शेख, उप शहर प्रमुख अक्षय गाडे, उप तालुका प्रमुख प्रकाश गायकवाड, प्रकाश चौथवे, त्रिलोक कतारी, महिला तालुका प्रमुख शीतल हासे, उप जिल्हा प्रमुख आशा केदारी, महिला शहर प्रमुख संगीता गायकवाड, माजी शहर प्रमुख प्रसाद पवार, प्रमोद कुलट, रोमान सय्यद रहीम बेग, देविदास वराडे, भगवान पोपळघट, भाऊसाहेब वराळे, उप शहर प्रमुख वेणूगोपाल लाहोटी, दीपक वनम, ग्राहक सारंक्षक कक्षाचे सदाशिव हासे, रिक्षा सेनेचे शहर प्रमुख अशोक बढे, उप तालुका प्रमुख शरद कवडे आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.