कॉग्रेसच्या संगमनेर तालुकाध्यक्ष पदी विजय शेळके!
◻️ जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते नियुक्तीपत्र आणि सत्कार
संगमनेर LIVE (आश्वी) | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाच्या संगमनेर तालुकाध्यक्ष पदी विजय शेळके या तरुण कार्यकर्त्याची निवड करण्यात आली आहे. कॉग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्तें नुकतेच त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करत त्यांचा सत्कार करण्यात आला.
विजय शेळके हे तालुक्यातील उंबरी बाळापुर येथील रहिवासी असून कॉग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून जनमानसात परिचित आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनाचा लाभ सर्व सामान्य नागरीकापर्यंत पोहचवण्यात त्यांचा मोठा हातखंड आहे. आश्वी आणि जोर्वे जिल्हापरिषद गटात त्याचा मोठा मित्रपरिवार असल्याने कॉग्रेस पक्षाचे तळागाळापर्यत संघटन वाढवण्यात विजय शेळके यांचा कॉग्रेसला मोठा फायदा होणार आहे. त्यामुळेचं काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाच्या संगमनेर तालुकाध्यक्ष पदी सर्वानुमते विजय शेळके यांची निवड करण्यात आली.
नुकतीच अनुसूचित जाती विभागाची बैठक संगमनेर येथे पार पडली. यावेळी जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बंटी यादव, जिल्हा कार्याध्यक्ष अरुण गावित्रे, विनोद गायकवाड, कमलेश गायकवाड, सचिन साळवे, रामनाथ गायकवाड, नंदकुमार कांबळे, नंदकुमार मोहिते, साहिल म्हस्के, सोमनाथ पगारे, सोपान धेनक, रवींद्र शिंदे, मारुतीराव सोनवणे, विशाल वाघमारे, सुरज म्हंकाळे, संदीप मोटे आदिंसह जिल्हाभरातून आलेले कॉग्रेसचे पदाधिकारी आणि तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल शेळके यांचे संगमनेर शेतकी संघाचे संचालक भाऊसाहेब खेमनर, रिपाइंचे (आठवले) तालुकाध्यक्ष आशिष शेळके, उंबरी बाळापूरच्या सरपंच अर्चना सभाष भुसाळ, उप सरपंच डॉ. अनिल सारबांदे, अँड. रवींद्र शेळके, अनिल भुसाळ, भीमाशंकर सारबदे, साहेबराव भुसाळ, रामराव चौधरी, नारायण खेमनर, संदेश शेळके, दादासाहेब शेळके, उल्हास गायकवाड, अशोक शेळके, विजय शेळके, अशोक उंबरकर, ह.भ.प. जगन्नाथ महाराज उंबरकर, विजय हिंगे, मच्छिंद्र भुसाळ, किसन खेमनर, विवेक डोखे, किरण भुसाळ, पुंजा भुसाळ, पोपट भुसाळ यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
काँग्रेस पक्षाचे पुरोगामी विचार व कार्य समाज्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचे काम जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे. तालुक्यात अनुसूचित जातीसह इतर समाज बांधवाचे संघटन मजबूत करण्याबरोबरच केंद्र व राज्य सरकारच्या योजना घराघरापर्यंत पोहचवण्याचे प्रामाणिक प्रयत्न पक्षाच्या माध्यमातून करणार असल्याची ग्वाही विजय शेळके यांनी दिली.