ब्रिगेडचे ज्ञानेश महाराव यांचा चप्पल आणि प्रतिमेला शाही फासून निषेध!
◻️ हिंदू देवतांचा अपमान केल्याबद्दल संगमनेर बस स्थानक येथे भाजपचे आंदोलन
◻️ महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
संगमनेर LIVE | भारतीय जनता पार्टी संगमनेर च्या वतीने वाशी येथे झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये ज्ञानेश महाराव यांनी हिंदू धर्माचे दैवत असलेल्या प्रभू श्रीराम लक्ष्मण, सीतामाता व श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करून हिंदू धर्माच्या भावना दुखावत हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप करत संगमनेर येथील बस स्थानक परिसरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने ज्ञानेश महाराव यांच्या प्रतिमेला चप्पल व काळी शाही फासून निषेध करण्यात आला.
पवारांसमोर हिंदू धर्माचा द्वेष, अपमान करताना पवारांच्या तोंडातून एक शब्द सुद्धा न निघणं ही एक शरमेची बाब असल्याचा आरोप आंदोलकानी केला आहे.
महविकास आघाडी सरकार मधील काही लोक जाणूनबुजून हिंदू धर्माचा अपमान करत आहे. यापूर्वी राम मंदिर बांधण्यावर आक्षेप घेतला. जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाचा अपमान केला तरी उद्धव ठाकरे व शरद पवार तुम्ही गप्प का असा प्रश्न आंदोलकांनी यावेळी विचारला आहे.
यावेळी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
आंदोलनाच्या सुरुवातीला स्वामी समर्थांच्या प्रतिमेला हार घालून गणपती व स्वामी समर्थांची आरती वराडे महाराज यांच्या हस्ते करण्यात आली.
आंदोलन प्रसंगी बोलताना भाजपा विधानसभा प्रमुख अमोल खताळ पाटील यांनी महाराव याला पाठीशी घालणाऱ्या शरद पवार यांचा निषेध करून यापुढे हिंदू देवतांचा अपमान केला तर नाठळाच्या माथी हाणू काठी या उक्तीप्रमाणे भाजपा विरोध करेल असे सांगितले.
दरम्यान वैभव लांडगे, राम जाजू, दादाभाऊ गुंजाळ, राजेंद्र सांगळे, रोहिदास साबळे, भारत गवळी, ज्योतीताई भोर, रेश्माताई खांडरे, अरुणाताई पवार, शशांक नामन, सुयोग गुंजाळ, शैलेश फटांगरे, संदेश देशमुख,कैलास भरितकर, विकास जाधव, महेश मांडेकर, भगवान गीते, विकास गुळवे, वाल्मीक शिंदे, बाबासाहेब गुळवे, संतोष हांडे, हरीश वलवे, नवनाथ जोंधळे, लहानु नवले, विनायक दाभोळकर, दिलीप कोल्हे, गोपीनाथ रूपवते, शंकर वाळे, गणेश वराडे, लहानु चाबुस्कावर, देविदास कदम, सुरेश लांडगे, सतीश गोपाळे, संदीप शेरमाळे, सुरेश निळे, शशिकांत मतकर, कैलास गोडसे, दशरथ कासार, पवन शिरतार, कमलेश डेरे, सुनील देशमुख, सुदाम बोऱ्हाडे, अण्णा खताळ, मारूती गोडसे, साईनाथ वाकचौरे, उमेश कोकणे, संजय देशमुख, उल्हास वामन सह कार्यकर्ते उपस्थित होते.