बिबट्याच्या हल्ल्यातील मृत महिलेच्या कुटुंबीयांचे सांत्वन
◻️ खासदार वाकचौरे, मा. आ. डॉ. तांबे, डॉ. जयश्री थोरात यांच्याकडून कुटुंबाची भेट
संगमनेर LIVE | निमगाव टेंभी येथील सौ. संगीता शिवाजी वर्पे या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, जयश्रीताई थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी वर्पे कुटुंबीयांना भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी शेतकी संघाचे संचालक शिवाजी आहेर, सरपंच नानासाहेब वर्पे, पोलीस पाटील रमेश वर्पे, गणपतराव सांगळे, अशोक सातपुते, शरद वर्पे, निवृत्ती शिंदे, विलास शिंदे, बाळासाहेब टेमगिरे, विशाल वर्पे, अक्षय वर्पे, राजेंद्र खरडे, उपविभागीय वनअधिकारी संदीप पाटील आदींसह गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.
सौ. संगीता शिवाजी वर्पे (वय - ४२) या आपल्या घराजवळ धुणं धुत होत्या. यावेळी शेजारी असलेल्या गिन्नी गवतात दबा धरून बिबट्याने त्यांच्यावर मागून हल्ला केला. यावेळी बिबट्याने त्यांची मान पकडली व त्यांना ओढत नेले होते. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी समजतात विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात हे मुंबईत असल्याने त्यांनी गावातील कार्यकर्त्यांच्या संवाद साधून तातडीने मदतीच्या सूचना दिल्या. याचबरोबर दूरध्वनीद्वारे शिवाजी वर्पे यांचेही सांत्वन केले.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात यांनीही तातडीने वर्पे कुटुंबीयांना भेट दिली. यानंतर पाठोपाठ शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही वर्पे कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे.
यावेळी मा. आमदार डॉ. तांबे म्हणाले की, बिबट्याच्या हल्ल्यातील घटना संगमनेर तालुक्यात वाढले आहे. याबाबत वन विभागाने तातडीने योग्य कार्यवाही करावी. डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, महिला या शेतामध्ये काम करत असतात. अशा हल्ल्यांमुळे महिलांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्या अशी मागणी केली. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ही वन विभागाला यावेळी सूचना केल्या आहेत.