पेशवेकालीन गणेश मंदिरात शाडू मातीच्या गणेश मूर्तीची स्थापना!
◻️ आश्वी खुर्द येथील गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल ऐतिहासिक पेशवेकालीन गणेश मंदिरात गणेशोत्सवानिमित्त कलाशिक्षक के. पी. तांबे यांनी बनविलेल्या पर्यावरण पुरक शाडू मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तीची गणेश चतुर्थी दिनी विधिवत स्थापना करण्यात आली असून गणरायाच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहे.
पेशवेकालीन काळात आश्वी येथील प्रवरा नदीवर असलेल्या घाटावर पेशव्याचे घोडे बांधण्याच्या पागा होत्या. यामुळेचं कालांतराने गावाला आधी आश्व आणि त्यानंतर आश्वी असे नाव पडल्याचे जुनी जाणती मंडळी सांगतात. याचं कालखंडात पेशव्यांनी प्रवरा तिरानजीक भव्य आणि सुंदर असे गणेश मंदिर बांधले होते. त्यामुळे या मंदिराला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले.
काही वर्षापूर्वी गावातील तरुणांनी ग्रामस्थ व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या गणपती मंदिराचा जिर्णोद्धार करत स्वंयभू गणेश मुर्तीची स्थापना केली.
कला शिक्षक के. पी. तांबे यांनी शाडुच्या मातीची सुदंर गणेश मुर्ती तयार करत त्यावर नैसर्गिक रंग देत मनमोहक मुर्ती तयार केली. त्या मुर्तीची गणेश चतुर्थीनिमित्त मंदिरात विधिवत स्थापना करण्यात केली. याप्रसंगी के. पी. तांबे, माजी उपसरपंच संजय गायकवाड, सौ. जयश्वी गायकवाड, माजी सरपंच म्हाळु गायकवाड, मोहन गायकवाड, ह.भ.प. सचिन गायकवाड, दिलीप मांढरे, आण्णा मांढरे, नानासाहेब गायकवाड, गुरु नितिन भाले, गंगा म्हस्के, कृष्णा हारदे, सचिन पोपळघट, ऋषिकेश डमाळे आदि उपस्थित होते.
दरम्यान नवसाला पावणारा गणपती अशी परिसरातील भावीकांची श्रध्दा असल्यामुळे गणेश उत्सवकाळात दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे चित्र आहे.