महसूलमंत्री ना. विखे पाटील यांच्याकडून आश्वी खुर्द येथील शेतकऱ्यांची तात्काळ दखल
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील गावठाण लगत असलेल्या शेतीमध्ये नुकतेच पावसाचे व गावातील गटारीचे पाणी साचले होते. त्यामुळे शेती पिकाची नुकसान झाले होते.
याबाबतची कैफियत शेतकरी इन्नुस सय्यद यांच्यासह लगतच्या गायकवाड कुटुंबातील अनेक शेतकऱ्यांनी मांडली होती. शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी आश्वी खुर्द ग्रामपंचायत, महसूल प्रशासन यांना तात्काळ शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याच्या सूचना दिल्या.
त्यामुळे गावच्या लोकनियुक्त प्रथम महिला सरपंच सौ. अलकाताई बापूसाहेब गायकवाड, उपसरपंच बाबासाहेब भवर, ग्रामपंचायत सदस्य सोपान सोनवणे, संजय भोसले, ग्रामविकास अधिकारी प्रवीण इल्हे, महसूल मंडलाधिकारी गडदे, तलाठी जाधव यांच्यासह मंत्री विखे पाटील यांचे स्विय साहयक बापूसाहेब गायकवाड आणि ग्रामपंचायत कर्मचारी आदिनाथ जाधव यांनी घटनास्थळी जाऊन सदर शेतातील पाणी जेसीबीच्या साह्याने काढून दिले. त्यामुळे बांधीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान समस्याचा निपटारा झाल्यामुळे शेतकऱ्यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील, सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्यासह ग्रामपंचायत आणि महसूल विभागाचे आभार मानले आहेत.