उद्यापासून संगमनेरमध्ये ‘इंदिरा महोत्सवा’ला सुरवात
◻️ प्रणिती शिंदे, भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. सुधीर तांबे राहणार उपस्थिती
◻️ बचत गटातील महिलांसाठी स्वयंरोजगाराची मोठी संधी
संगमनेर LIVE | काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून महिला बचत गटांना स्वयंरोजगार मार्गदर्शनासाठी होत असलेल्या इंदिरा महत्त्वाचे उद्घाटन खासदार प्रणिती शिंदे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत उद्या मंगळवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावरील अमृतसर मंदिरासमोरील लागणार या महोत्सवाची जय्यत करण्यात आली आहे. या महोत्सवात बचत गटांच्या महिलांचे विविध स्टॉल असणार असून याचबरोबर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्या ही सहभागी होणार आहेत .महिलांना स्वयंरोजगार व गृह उद्योग मिळण्यासाठी हा महोत्सव लाभदायी ठरणार आहे.
या महोत्सवाचा शुभारंभ उद्या मंगळवार दि. ३ सप्टेंबर रोजी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, मा. आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थित होणार असून यावेळी आमदार सत्यजित तांबे, सौ. कांचनताई थोरात, सौ. दुर्गाताई तांबे, आयोजक डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तर बुधवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांच्यासह युवा व्याख्याते गणेश शिंदे, सौ. प्रभावती घोगरे, लिजेत पापडचे सुरेश कोते यांच्यासह राज्य पातळीवर विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या महोत्सवात उपस्थित सर्व महिलांची आरोग्य तपासणी होणार असून महिलांना गृह उद्योग स्वयंरोजगार याबाबत थेट कंपन्यांशी करारासह बँकांची ही मार्गदर्शन मिळणार आहे.
दरम्यान या इंदिरा महोत्सवात तालुक्यातील जास्तीत जास्त महिला युवती यांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. जयश्रीताई थोरात व सौ. दुर्गाताई तांबे यांनी केले आहे.