कर्मवीराचे स्वप्न पुर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वाची- सत्यजित तांबे
◻️आश्वी बुद्रुक येथे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३७ वी जयंती साजरी
संगमनेर LIVE (आश्वी) | इंग्रजी व खाजगी शाळांच्या बरोबरीची व्यवस्था उभी करण्याची जबाबदारी आपली सर्वाची आहे. रयतची शाळा टिकली पाहिजे, वाढली पाहिजे यासाठी आपणांस प्रयत्न करावे लागतील. रयतच्या सर्व शाळांमध्ये अश्वी इंग्लिश स्कूल या शाळेने आपला वेगळा लौकीक जपला आहे. वंचित लोकांना शिक्षण मिळावे यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कर्मवीराचे तेचं स्वप्न पुर्ण करण्याचे काम रयतमधील मंडळी करत असल्याचे गौरवोद्गार नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी काढले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील अश्वी इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सत्यजित तांबे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे जेष्ठ सदस्य बाळकृष्ण होडगर होते.
प्रमुख वक्ते व माजी पर्यवेक्षक पोपटराव पवार, प्राचार्य आर. एन. शहाणे, माजी प्राचार्य जनार्दन बर्डे, माजी प्राचार्य व्ही. टी. गायकवाड, सुमतीलाल गांधी, दिलीप गांधी, बाळासाहेब गायकवाड आदिसह सरपंच, उपसरपंच, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
आमदार तांबे पुढे म्हणाले, जगात आणि देशात काही मोठे घडवून आणायचे असल्यास ते फक्त संघर्षातून पुढे आलेलेचं घडवू शकतात. आताच्या मुलांना सर्व सुख सुविधा उपलब्ध होत असल्याने संघर्ष करणाऱ्याची पिढी घडणार नसल्याची चिंता तांबे यांनी व्यक्त केली. रयतमध्ये शिकलेली मुले जगभरात विविध पदांवर काम करत असल्यामुळे त्यांना भेटून आनंद होतो. कोणत्या जातीत, धर्मात किंवा कुटुंबात जन्माला यायचं हे आपल्या हातात नसले तरी, जीवन जगताना त्याचां शेवट चांगला करणे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे आपल्या आई - वडिलांचे, गावचे, जिल्ह्याचे नाव आपण मोठे केले पाहिजे. तीचं खऱ्या अर्थाने कर्मवीर भाऊराव पाटील यांना श्रद्धांजली ठरेल असे ते शेवटी म्हणाले. तर शाळेला सर्वोतोपरी मदतीची ग्वाही देखील दिली.
दरम्यान याआधी सकाळी सजविलेल्या ट्रॅक्टर मधुन कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची गावातील मुख्य रस्त्यावरून शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत लेझीम, झांज, दांडियाची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी ग्रामस्थांनी दुतर्फा मोठी गर्दी केली होती.
दिलिप गांधी यांचे दातृत्व..
आश्वी येथील प्रतिष्ठित व्यापारी दिलिप गांधी यांनी शालेय विद्यार्थ्याना ४ हजार वह्या दिल्या. तसेच शुद्ध आणि स्वच्छ पाणी विद्यार्थ्याना पिण्यासाठी उपलब्ध व्हावे यासाठी अंदाजे २ लाख ५० हजार रुपये किमंतीचा आ. रो. प्लांट देखील दिला आहे. त्यामुळे शाळेसह ग्रामस्थ आणि आमदार सत्यजित तांबे यांनी दिलिप गांधी यांच्या दातृत्वाचे कौतुक केले. याप्रसंगी १९७८-७९ च्या १० वी इयत्तेतील माजी विद्यार्थ्यानी शाळेला ५० हजार रुपये किंमतीची साऊंड सिस्टीम भेट दिली आहे.