राष्ट्रपतींच्या हस्ते बाळासाहेब थोरात यांना ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार!

संगमनेर Live
0
राष्ट्रपतींच्या हस्ते बाळासाहेब थोरात यांना ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार!

◻️ मिळालेला पुरस्कार हा जनतेचा सन्मान - बाळासाहेब थोरात

संगमनेर LIVE | महाराष्ट्राच्या कृषी, साहित्य, सहकार, समाजकारण, शिक्षण या सर्व क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्याबरोबरचं राज्य मंत्रीमंडळात अनेक महत्त्वाची खाते भूषवताना सर्व खात्यांना लोकाभिमुख करणारे विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य तथा काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा राष्ट्रपती महामहीम द्रौपदी  मुर्मू यांच्या हस्ते ‘उत्कृष्ट संसदपटू’ हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

मुंबई विधानभवन येथे राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने २०१८-१९ चा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार आमदार थोरात यांना राष्ट्रपतीच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सभापती राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

१९८५ पासून संगमनेर विधानसभा मतदारसंघातून आमदार थोरात यांनी सलग आठ वेळा विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला आहे. चाळीस वर्षाच्या संसदीय राजकारणात यशवंतराव चव्हाण यांचा समृद्ध वारसा जपताना  समाजकारण, सहकार, शिक्षण, ग्रामीण विकास, पर्यावरण, दुग्ध व्यवसाय अशा विविध क्षेत्रात बाळासाहेब थोरात यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

याचबरोबर राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण,  खार जमीन, राजशिष्टाचार, रोहयो, जलसंधारण असे विविध मंत्रीपदे भूषवताना या सर्व खात्यांना लोकाभिमुख बनवले. महसूल मंत्री पदाच्या काळात ऑनलाईन सातबारा, विद्यार्थ्याना शाळेत ८० लाख दाखले देण्याचा विक्रम, खंडकरी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणे, तर शिक्षण मंत्री पदाच्या काळात बेस्ट ऑफ फाईव्ह व कृषी मंत्री पदाच्या काळात एक लाख शेततळ्यांची निर्मिती केली.

राज्य व राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करताना जिल्ह्यामध्ये दुष्काळी भागाला वरदान ठरणारे निळवंडे धरण व कालवे पूर्ण करण्यात मोलाचे योगदान दिले. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात संगमनेरच्या सहकारी संस्था या देशाला आदर्शवत असे काम करत असून ग्रामीण विकासात तालुका हा मॉडेल ठरला आहे.

विधिमंडळ पक्षाचे नेते, मा. प्रदेशाध्यक्ष असे विविध पद भूषवताना त्यांनी कायम महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केले. काँग्रेसच्या सर्वोच्च राष्ट्रीय वर्गीकरण कमिटीचे सदस्य तसेच हिमाचल व गुजरातचे निरीक्षक म्हणूनही पदे भूषवली आहेत.

२०१८-१९ या काळामध्ये भाजप प्रणित सरकार होते अशा काळात काँग्रेसकडून विधानसभेत अत्यंत अभ्यासूपणे प्रभावी मांडणी करणारे व सर्वांना सोबत घेऊन पक्षाचे नेतृत्व करणारे आमदार बाळासाहेब थोरात यांना उत्कृष्ट संसदपटू हा मानाचा पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला आहे.

मिळालेला पुरस्कार हा जनतेचा सन्मान - बाळासाहेब थोरात

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांवर वाटचाल करत गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी आपण अविरत काम करत आहोत. यामध्ये तालुक्यातील जनतेचे मोठे प्रेम, कार्यकर्त्यांची फळी, नेतृत्वाचा विश्वास आणि सर्वांचे सहकार्य यामुळे या ४० वर्षाच्या राजकीय जीवनात अनेक पुरस्कारांबरोबर उत्कृष्ट संसदपटू हा मिळालेल्या पुरस्कार सर्वसामान्य जनतेच्या सन्मान असल्याचे काँग्रेस पक्षाचे नेते तथा राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !