सरकार कोणाचेही आले तरी, ना. आठवले यांचे मंत्रीपद पक्के - नितीन गडकरी

संगमनेर Live
0
सरकार कोणाचेही आले तरी, रामदास आठवले यांचे मंत्रीपद पक्के - नितीन गडकरी 

◻️ मारवाडी फाउंडेशनचा ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते रामदास आठवलेना प्रदान

◻️ डाँ. आंबेडकरांच्या नावाने पुरस्कार मिळणे हा आयुष्यातील सर्वोच्च क्षण - मंत्री रामदास आठवले

संगमनेर LIVE (मुंबई) | आम्हाला चौथ्यांदा सत्तेत येण्याची गॅरंटी नाही. मात्र रामदास आठवले यांना आमचे सरकार येऊन मंत्री होण्याची गॅरंटी आहे. खरे म्हणजे सरकार कोणाचेही आले तरी ना. रामदास आठवले यांचे मंत्रीपद पक्के आहे. असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. 

नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात मारवाडी फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा ‘भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार २०२४’ रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांना नितीन गडकरींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना गडकरी बोलत होते. 

कार्यक्रमाला फाऊंडेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, सुधीर बाहेती, श्रीकृष्ण चांडक, अंनिसचे अध्यक्ष श्याम मानव, माजी खासदार प्रदीप गांधी, सीमा आठवले यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. पाच लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

मंत्री गडकरी म्हणाले की, ना. आठवले आता तिसऱ्यांदा केंद्रात मंत्री आहेत. पुढे होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आमचे सरकार येऊन त्यांना पुन्हा मंत्री होण्याची गॅरंटी आहे. आम्हाला मात्र ती गॅरंटी नाही. गमतीने मी नेहमीच म्हणत असतो की, राज्य कोणाचेही आले तरी ना. रामदास आठवले यांचे स्थान मंत्रिमंडळात पक्के आहे. एकदा लालुप्रसाद यादव हे रामविलास पासवान यांना म्हणाले होते की, ना. आठवले हे राजकीय हवामान तज्ज्ञ असल्याची मिश्किल टिप्पणी केली.

तर गिरीश गांधी, सामाजिक , राजकीय, साहित्यीक अशा सर्वच क्षेत्रातील व्यक्तींना प्रोत्साहन देत असल्याचे गडकरी म्हणाले.  

मी चळवळीतुन पुढे आलो असून समाजामध्ये व्यावहारीक आंबेडकरवाद रुजवायचा आहे. सर्व जाती धर्मीय समाजाला जोडायचे आहे. देश एकसंघ जोडून ठेवला पाहिजे हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भावना होती. त्यानुसार सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी आपला संघर्ष सुरू आहे. डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने पुरस्कार मिळतो हे माझ्या आयुष्यातील मोठा क्षण आहे. असे सत्काराला उत्तर देताना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले म्हणाले.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेत येण्याचे तंत्र माहीत असल्याने आम्ही चौथ्यांदा केंद्रात सरकार बनवू असा विश्वास ना. आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !