प्रतापपूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची सभा खेळीमेळीत
◽ सोसायटी सभागृहाचे ‘स्व. निवृत्ती पाटील इलग’ असे नामकरण
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन गजानन आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात नुकतीच पार पडली.
यावेळी संस्थेचे सचिव उनवणे यांनी मागील सभेचे प्रोसिडींग व अहवाल वाचन केले. त्याला सभासदांनी सर्वानुमते मान्यता दिली. मागील तीन वर्षापासून काटकसरीने व्यवहार करून सभासदांना लाभांशाचे वाटप केले जात असल्याने सोसायटीला सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात ऑडिट वर्ग ‘ब’ मिळाला आहे.
सेवा सोसायटीच्या बैठक सभागृहाचे सुशोभीकरण करण्यासाठी जेष्ठ नेते भगवानराव इलग यांनी १ लाख ७५ हजार रुपये व्यक्तिगत खर्च केला. त्यामुळे सभागृहाला सेवा सोसायटीचे संस्थापक स्व. निवृत्ती पाटील इलग यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच यावेळी सभासदांनी समाजभूषण भगवानराव इलग यांचा अभिनंदना चा ठराव संमत केला आहे. यावेळी भगवानराव इलग, दिनकर आंधळे, बाळकृष्ण सांगळे आदिनी सभासदांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सेवा सोसायटीचे व्हा. चेअरमन सखाराम आंधळे, सरपंच पांडुरंग आंधळे, उपसरपंच सौ. अनिता अजय आंधळे, पोलीस पाटील विठ्ठल आंधळे, सुखदेव आंधळे, रंगनाथ आंधळे, लक्ष्मण आंधळे, कचेश्वर आंधळे, प्रा. डॉ. बाळासाहेब आंधळे, दगडू आंधळे, सखाराम आंधळे, भिमाशंकर आंधळे, नाना गेणू आंधळे, ज्ञानेश्वर आंधळे, सुरेश इलग, भिमाजी सांगळे, जनार्धन फड, शिवराम आंधळे, काशिनाथ आंधळे, सुभाष आंधळे, श्रीधर आंधळे, शंकर सांगळे, सोमनाथ गिते, मुक्ताजी बिडवे, सोमनाथ आंधळे, दादाहरी गिते व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
दरम्यान यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन सखाराम आंधळे यांनी सर्व सभासदांचे आभार मानले.