सोने चुमकवून देण्याच्या बाहण्याने महिलेचे ४० हजाराचे दागिने लांबवले
◻️ पिप्री - लौकी अजमपूर येथे चोरट्यांचा वृध्द महिलेला भर दिवसा गंडा
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील पिप्री - लौकी अजमपूर येथे चोरट्यांनी भर दिवसा वृध्द महिलेला सोने चुमकवून देतो असे म्हणत ४० हजाराचे दागिने लांबवले आहे. त्यामुळे परिसरात एकचं खळबळ उडाली असून आश्वी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंधूबाई सुखदेव भोंडे (वय - ७५) या वृध्द महिलेने पोलीसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रविवार दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास मी घरी एकटी असताना अनोळखी दोघे जण आले होते. ते म्हणाले आमच्या कडे पावडर असून तिने तुमच्या कानातील टाप्स आणि डोरलं चुमकवून देतो.
यावेळी त्यांनी मला घरातून हळद आणण्यासाठी सांगितले. मी हळद आणण्यासाठी घरात गेल्यानंतर २० हजार रुपये किंमतीचे गळ्यातील चार ग्रॅम सोन्याचे डोरलं आणि त्यातील एक ग्रॅम सोन्याचे नऊ मणी तसेच २० हजार रुपये किंमतीचे पाच ग्रॅम वजनाचे कानातील टाप्स असा तब्बल ४० हजाराचा मुद्देमाल घेऊन ते दोघे जण पसार झाले आहेत.
त्यामुळे आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा रंजिस्टर नंबर १७२/२०२४ नुसार कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलीसांनी लवकरात लवकर या चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.