गणेशोत्सवानिमित्त दिल्या जाणाऱ्या आनंदाच्या शिध्यापासून लाभार्थी वंचित
◻️ शिधा वाटप वस्तूंचा साठा आपूरा आल्यामुळे नागरीकांनमध्ये नाराजी
◻️ लोकहिताच्या जुन्या योजनाची पुर्तता करण्यात सरकारची दमछाक?
संगमनेर LIVE (आश्वी) | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली होती. मात्र गणेशोत्सव संपून पंधरा दिवस होत आले तरी आनंदाचा शिधा अनेक गावातील नागरीकांना मिळालेला नाही. तर पुरवठा विभागाकडून आनंदाचा शिधाचं आपूरा आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सण उत्सव काळात नागरीकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी राज्य सरकारने १०० रुपयांत आनंदाचा शिधा ही योजना सुरू केली. यात १ किलो रवा, हरभरा दाळ, साखर आणि १ लिटर सोयाबीन तेल दिले जाते. त्यामुळे आनंदाचा शिधा घेण्यासाठी गोरगरीब जनता वाट पाहत असते.
गणेशोत्सव काळात आनंदाचा शिधा वाटप वस्तूंचा साठा कमी आल्यामुळे काही गावांमध्ये आद्याप वाटप करण्यात आलेले नाही. तर आपूरा साठा आल्यामुळे आनंदाचा शिधा मिळण्यापासून आश्वी जिल्हापरिषद गटातील नागरीक वंचित राहत असलेले लाभार्थी आता तक्रार करु लागले आहे.
त्यामुळे घोषणांचा पाऊस पाडणाऱ्या सरकारची लोकहिताच्या योजनाची पुर्तता करण्यात मात्र दमछाक? होत असल्याची चर्चा नागरीकांमध्ये सुरू आहे.