◻️ चणेगाव शिवारातील घटना ; मृत व्यक्ती राहुरी तालुक्यातील
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील चणेगाव शिवारात शनिवारी सकाळी प्रवरा उजव्या कालव्यातील चारीत सायकलसह एक मृतदेह पडलेला आढळून आला होता. ही माहिती बाबासाहेब सोनवणे यांनी पोलीसांना दिली होती.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, चणेगाव शिवारातून प्रवरा उजवा कालवा जातो. याठिकाणी असलेल्या चारीत शनिवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास एक व्यक्ती सायकसह पालथा पडलेला दिसला. त्यामुळे ही बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली असता बाबासाहेब सोनवणे यांनी याबाबतची माहिती आश्वी पोलीसाना कळवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीसानी घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केल्यानंतर मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी पाठवून दिला.
मिळालेल्या माहितीनुसार मृत पावलेली व्यक्ती ही राहुरी तालुक्यातील निभेंरे येथील रहिवासी होती. त्यांचे नाव रमेश बन्सी सोनवणे (वय - ५२) असे पोलीसांनी सांगितले असून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान मयत रमेश सोनवणे यांच्या घरची परिस्थिती जेमतेम असल्याने मोलमजुरी करून ते कुटुबांचा उदरनिर्वाह चालवत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली व जावई असा मोठा परिवार असल्याची माहिती स्थानिकानी दिली आहे.