संगमनेर रोटरी क्लबचे शाश्वत सामाजिक कार्य उल्लेखनीय - डॉ. सुरेश साबू
◻️ रोटरी सदस्यांची तब्बल दीड लाखांची मदत जाहीर
संगमनेर LIVE | रोटरी क्लब ऑफ संगमनेरचे सामाजिक कार्य अतिशय उल्लेखनीय असून ते गेल्या कित्येक वर्षापासून अविरत आणि शाश्वत सुरु आहे. याही वर्षी अध्यक्ष आणि सदस्यांच्या मदतीने भरीव कार्य प्रत्यक्षात येईल अशी अशा बाळगतो, असे उद्गार रोटरी जिल्हा ३१३२ चे प्रांतपाल डॉ. सुरेश साबू यांनी काढले.
रोटरी क्लब ऑफ संगमनेर येथे दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी डॉ. सुरेश साबू यांनी संगमनेर कार्यालयास भेट दिली होती. त्यावेळी उपस्थितांशी ते बोलत होते. रोटरी क्लब ऑफ संगमनेरचा शाश्वत आणि सर्वात महत्त्वपूर्ण प्रकल्प म्हणजेच दर्शन रोटरी आय केअर हॉस्पिटल या ठिकाणी भेट दिली.
यावेळी फर्स्ट लेडी सौ. निर्मलाताई साबु, उपप्रांतपाल विनोद पाटणी, रोटरी क्लब ऑफ संगमनेरचे अध्यक्ष साईनाथ साबळे, सेक्रेटरी विश्वनाथ मालानी, खजिनदार विकास लावरे, ज्येष्ठ सदस्य दिलीप मालपाणी, अजित काकडे, दीपक मणियार, माजी अध्यक्ष आनंद हासे, माजी सचिव मधुसूदन करावा, माजी खजिनदार अमित पवार, आणि रोटरी ऑफ संगमनेरचे सर्व माजी अध्यक्ष, सर्व रोटरी संचालक व रोटरी सदस्य उपस्थित होते.
यावेळी प्रांतपाल डॉ. साबू यांनी क्लबचे व दर्शन रोटरी आय केअर ट्रस्ट चे सर्व कागदपत्रे समजून घेऊन तपासून घेतली व अध्यक्ष व सचिव यांना आवश्यक सूचना दिल्या. ही भेट अतिशय आनंदी व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सदस्यांशी चर्चा करत असताना, प्रामुख्याने नवीन सभासद वाढवणे व महिला रोटरियन यांना सभासद करून घेणे, डोनेशन रोटरी फाउंडेशन यांना पाठवणे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्व संचालाकासोबत एकत्र बैठक झाली. या ठिकाणी पिंपळगाव माथा येथील जिल्हा परिषद शाळेतील पाच मुलींना पाच मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले.
यावेळी संगमनेर रोटरी क्लब ऑफ संगमनेरचे चार्टरड प्रेसिडेंट डॉ. सुधाकर पेटकर यांचा रोटरी क्लब ऑफ संगमनेर साठीच्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. त्यानंतर दर्शन रोटरी आय केअरचे अध्यक्ष, सीए संजय राठी यांचा सत्कार डॉ. साबू यांच्या हस्ते करण्यात आला.
त्यानंतर दहा रोटरी सदस्यांच्या महिला प्रतिनिधींनी रोटरी क्लब ऑफ संगमनेर मध्ये पदार्पण करण्याचा मानस जाहीर केला. त्याला अध्यक्ष साईनाथ साबळे यांनी अनुमोदन दिले.
यावेळी डॉ. सुरेशजी साबू यांच्या उपस्थितीत १४ सदस्यानी द रोटरी फौंडेशन साठी १७५० डॉलरची मदत (डोनेशन) जाहीर केली. यावेळी अध्यक्ष साईनाथ साबळे यांनी पाचशे डॉलर आणि मनमोहन वर्मा, पवन कुमार वर्मा, संदीप फटांगरे, हृषिकेश मोंढे, सुनील कडलग, संतोष आहेर, विश्वनाथ मालानी, सुदीप वाकळे, प्रमोद मणियार, विकास लावरे, विजय थोरात, सुनिल दिवेकर यांनी प्रत्येकी शंभर डॉलर अशी एकूण १७५० डॉलर म्हणजेच तब्बल दीड लाख रुपयांची रोख मदत जाहीर केली.
यावेळी अध्यक्ष साईनाथ साबळे यांनी आपल्या भाषणामध्ये दोन महिन्यात झालेले व येत्या काळातील प्रकल्प यांचा उल्लेख केला व पुढील प्रोजेक्ट काय करणार आहे, यासंबंधी सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये आनंदी रस्ते, ऊस कामगारांसोबत भाऊबीज, कॅन्सर तपासणी व मार्गदर्शन अशा प्रोजेक्ट संदर्भात माहिती दिली. तसेच माजी सैनिकांवर रक्षाबंधन हे जे प्रोजेक्ट झाले आहे त्याविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन भूषण नावंदर व सौरव म्हाळस यांनी केले. रोटरीचे सचिव विश्वनाथ मालानी यांनी आभार मानले.