गणेश उत्सवाच्या आनंद पर्वातून समतेची भावना वाढीस - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
गणेश उत्सवाच्या आनंद पर्वातून समतेची भावना वाढीस - बाळासाहेब थोरात

◻️ माजी मंत्री थोरात यांच्या हस्ते संगमनेर मध्ये विविध गणेश मंडळ आरती

संगमनेर LIVE | अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या संगमनेर शहरात पौराणिक, ऐतिहासिक व विविध आकर्षक देखाव्यांसह गणेश मंडळांनी मोठे आरस केले आहे. हे आरस पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी शहर व ग्रामीण भागात विविध गणेश मंडळाच्या आरतींना भेट दिली याचबरोबर या गणेशोत्सवाच्या आनंदपर्वातून समतेची भावना वाढीस लागत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

संगमनेर शहरात बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते विविध ठिकाणी गणेश मंडळांची आरती झाली. यावेळी समवेत सौ. कांचनताई थोरात, सौ. दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, सौ. रचनाताई मालपाणी आदींसह संगमनेर शहरातील अनेक महिला पदाधिकारी युवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, यावर्षी राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. धरणे भरली आहेत. परंतु अजूनही ज्या भागांमध्ये पाऊस नाही त्या भागामध्ये पाऊस व्हावा. गणेशोत्सवाला मोठी परंपरा असून हा उत्सव आता देशाचा झाला आहे. याचबरोबर बाहेरील देशांमध्ये मोठ्या आनंदाने हा उत्सव आता साजरा होतो आहे. सर्वजण एकत्र येऊन दहा दिवस आनंद साजरा करतात. सर्वांनी एकत्र येऊन समतेची भावना वाढीस लागावी. प्रत्येकाने एकमेकांच्या सु:ख दुःखात सहभागी व्हावे हा संदेश देणारा हा सण आहे. मात्र काही लोक यामध्येही राजकारण करून धार्मिकतेचे राजकारण करत आहेत. सध्या देशात व राज्यामध्ये विकासाऐवजी होत असलेले धर्माचे राजकारण हे अत्यंत दुर्दैवी आहे.

राज्यामध्ये सरकार अस्थिर असून महिला व बालिका सुरक्षित नाहीत. महिला व बालिका सुरक्षित व्हाव्यात, शेतकरी समाधानी व्हावा, तरुणांच्या हाताला काम मिळावे. राज्यात उद्योग व्यवसाय वाढून महाराष्ट्र हे पुन्हा वैभवशाली व समृद्ध राष्ट्र व्हावे ही गणेश चरणी प्रार्थना करताना संगमनेर मध्ये सर्वांनी मोठ्या आनंदानं गणेशोत्सव साजरा केला आहे. गणेश विसर्जन करताना तरुणांनी अति उत्साह न दाखवता दुर्घटना टाळण्यासाठी संयम बाळगावा. पर्यावरण पूरक व स्वच्छतेचा संदेश देणारा या वर्षीचा गणेश उत्सव ठरावा असेही ते म्हणाले.

डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, गणेश विसर्जनासाठी एकविरा फाउंडेशनच्या वतीने ३०० स्वयंसेवक निर्माल्य संकलन व विसर्जनासाठी सर्व नागरिकांना मदत करणार आहेत. तरुणांनी नदीकाठी विसर्जन करताना अती उत्साह व पाण्यात जाऊन सेल्फी साठी जास्त धाडस करू नये असे आवाहन केले.

बाळासाहेब थोरात यांच्या समवेत सेल्फीसाठी तरुणाईची गर्दी..

जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची ओळख राज्यातील सूसंस्कृत नेते म्हणून असल्याने त्यांची तरुणाईमध्ये मोठी क्रेझ आहे. संगमनेर मधील तरुणांसाठी ते आयकॉन असून प्रत्येक गणेश मंडळाच्या ठिकाणी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समवेत सेल्फी व फोटो घेण्यासाठी तरुणांची व कार्यकर्त्यांची मोठी केली होती.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !