राहुरीत भाजपसह महायुतीला मोठे खिंडार!
◻️ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विखे पाटलांना मोठा धक्का
◻️ रावसाहेब (चाचा) तनपुरेंसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेस नेते ना. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
संगमनेर LIVE | काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी कायम सर्वांना सोबत घेऊन गोरगरिब व सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम केले. याउलट भाजपाचे लोक अत्यंत सूडबुद्धीने राजकारण करत असून राहुरीच्या विकासात त्यांनी मोठा अडथळा निर्माण केला आहे. यामुळे राहुरी विकास मंडळाचे रावसाहेब चाचा तनपुरे यांच्यासह त्यांच्या शेकडो समर्थकांनी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यामुळे भाजपसह महायुतीला मोठे खिंडार पडले असून हा विखेंना मोठा धक्का मानला जात आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याच्या अतिथी गृहावर काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये रावसाहेब चाचा तनपुरे यांनी काँग्रेसमध्ये हजारो समर्थकांसह प्रवेश केला.
यावेळी व्यासपीठावर गोपाळशेठ अग्रवाल, दिलीपशेठ पारख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव, सत्तू नाना पवार, सुभाष वराळे, रामभाऊ बोराडे, मदनशेठ मुथा, अशोक तनपुरे, डॉ. धनंजय मेहेत्रे, ज्ञानेश्वर पोपळघट, सोन्याबापू जगधने, सुनील पवार, नारायण धोंगडे, दिलीप पारख, नवनीत दरक, भाऊसाहेब काकडे, गोपाल अग्रवाल, आतिक बागवान, किशोर तनपुरे, सचिन काशीद, शुभम नारद, दादासाहेब तोडमल प्रतीक तनपुरे, सत्यवान पवार, कारभारी खुळे, रामदास जाधव, आप्पासाहेब तमनर, वसीम देशमुख, राजू मकासारे , रामचंद्र भांड, सुरेश कोतकर आदीं उपस्थित होते.
याप्रसंगी बाळासाहेब थोरात म्हणाले की, राहुरी तालुका हा काँग्रेसच्या विचाराचा राहिला. जिल्ह्यातील प्रगतशील व ९० टक्के बागायत आणि समृद्धी असलेला हा तालुका आहे. कार्यकर्त्याची मोठी फळी आहे. जेथे कारखाना चांगला तिथली अर्थव्यवस्था चांगली होते. मात्र राहुरी कारखाना हा शेतकरी, कामगार, सर्वसामान्य नागरिक ताब्यात राहावा म्हणून त्यांनी सुरू केला. याउलट गणेश कारखाना आम्ही त्या शेतकऱ्यांची हित व्हावे याकरता सुरू केला. आमचा हेतू प्रामाणिक व स्वच्छ आहे.
या कामाला परमेश्वराचा कायम आशीर्वाद आहे, म्हणून चांगले काम होत आहे. राहुरीबाबत सर्व उलटे झाले. शेतकऱ्यासह शैक्षणिक संस्थांचा मोठा प्रश्न आहे. नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी चुकीचे असेल तेथे जागृत राहिले पाहिजे आणि चांगले काम करणाऱ्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.
आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली मात्र घरगुती वस्तूंचे भाव खूप वाढवले. आपण कधीही पक्षनिष्ठा सोडली नाही तत्वाचे राजकारण केले. काहींनी सत्तेसाठी सातत्याने कोलंट उड्या मारल्या ते जनतेला माहित आहेत. सर्वांनी एक दिलाने काम करा महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्ष कायम तुमच्या पाठीशी राहील असेही आमदार थोरात म्हणाले.
रावसाहेब तनपुरे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात हे जिल्ह्यातील सर्वाना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व आहे. सुसंस्कृत राजकारण ही त्यांची पद्धत आहे. सहकारातून समृद्धी त्यांनी निर्माण केली आहे. राहुरी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक आमदार थोरात यांचे नेतृत्व मानत आहे. याउलट भाजपाचे लोक दडपशाहीचे राजकारण करत आहेत. यापुढील काळात राहुरी तालुक्याच्या प्रगतीसाठी सर्व मित्र परिवार एकत्र येऊन काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी व आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी भक्कम उभे राहील असे ते म्हणाले.
दरम्यान यावेळी शेकडो समर्थकांसह त्यानी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विखेंना मोठा धक्का..
फोडाफोडीचे राजकारण हे जनतेला मान्य नसून महायुती सरकारकडून हे सातत्याने घडत आहे. भाजपचे दडपशाही आणि दबावाचे राजकारण जनतेला नको आहे. राहुरीच्या विकासासाठी सुसंस्कृत राजकारणाच्या पाठीशी उभे राहून सर्व कार्यकर्ते काँग्रेस पक्षात आल्याने महाविकास आघाडी भक्कम होत असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यानी दिली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री विखे यांच्यासह भाजप व महायुतीला हा मोठा धक्का मानला जात आहे.