लाडक्या बहीणींचे आशीर्वाद महायुतीच्या पाठीशी - डॉ. सुजय विखे पाटील
◻️आश्वी खुर्द आणि बुद्रूक येथे बचत गट, भजनी मंडळाना साहीत्य वितरण आणि विकास कामाचे भुमीपूजन
◻️ सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत आपला जिल्हा राज्यात अग्रेसर
संगमनेर LIVE (आश्वी) | पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सरकारी योजनांची अंमलबजावणी जिल्ह्यात प्रभावीपणे झाल्यामुळेच आपला जिल्हा राज्यात अग्रेसर ठरला आहे. सरकारच्या योजना आणि जनसेवा फौडेशनच्या उपक्रमामुळे लाडक्या बहीणींचे आशीर्वाद भविष्यात महायुतीच्या पाठीशी असतील असा विश्वास डाॅ. सुजय विखे पाटील त्यांनी व्यक्त केला.
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द आणि बुद्रूक येथे जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून महीला बचत गटांना पीठाची गिरणी आणि भजनी मंडळाना साहीत्याचे वितरण डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतील विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
डॉ. सुजय विखे म्हणाले की, विखे पाटील परीवाराने नेहमीच राजकारणा पलिकडे जावून सामाजिक बांधिलकी जोपासली. पद्मश्री विखे पाटील यांच्यापासून विखे पाटील परीवाराने वारकरी सांप्रदायाशी नाळ जोडली. आज या परंपरेला बांधील राहून पुढच्या पिढीनेही वारकरी सांप्रदयासाठी योगदान देण्याचे काम सुरू ठेवले असल्याचे ते म्हणाले. मतदार संघातील भजनी मंडळाकरीता साहीत्य उपलब्ध करून देण्यामुळे सेवाभाव जपता आल्याचे त्यांनी सांगितले.
जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमीच महीलांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. बचत गटाच्या चळवळीने महीलांना मोठी संधी निर्माण करून दिल्याचा उल्लेख करून समाजातील अर्थिक सामाजिक परीवर्तनात महीलांचे योगदान महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
आज राज्यात महायुती सरकारने अनेक योजना सर्व समाज घटकांसाठी सुरू केल्या आहेत. राज्य सरकारने जेष्ठ नागरीकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना, तिर्थदर्शन योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि युवकांसाठी युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करून सर्व समाज घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे.
सर्व योजनांची अंमलबजावणी जिल्ह्यात पालक मंत्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्याने राज्यात आपला जिल्हा अग्रस्थानी आहे. मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध झाला. या भागातील सर्वच गावांच्या रस्ते विकासाला प्राधान्य दिल्याने दळणवळण सुरक्षित झाले. पुर्वी काय परीस्थीती होती आणि आता विकासामुळे कसा बदल झाला याची सर्व परीस्थीती तुमच्या समोर आहे.
युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नाला प्राधान्य देवून शिर्डी येथे औद्यगिक वसाहत निर्माण करण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी जागा उपलब्ध करून दिली. निळवंडे कालव्याचे कामही पूर्ण झाल्याने आज पाणी शेतकार्यांना मिळाले. महायुती सरकारमुळे निळवंडेचा प्रश्न मार्गी लागला असे डाॅ. विखे पाटील म्हणाले.