बाळासाहेब गायकवाड यांचा आरपीआयच्या सर्व पदांचा राजीनामा
◻️ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाला नगर जिल्ह्यात मोठा धक्का
◻️ विधानसभेला आरपीआय कार्यकर्त्याला उमेदवारी न दिल्याने गायकवाड होते नाराज
संगमनेर LIVE | रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला महायुती सरकारने राज्यांमध्ये विधानसभेत एकही जागा दिली नसून आरपीआय कार्यकर्त्याचा मोठा अपमान केला आहे. त्यामुळे पुरोगामी विचारांचे पाईक असलेले व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते बाळासाहेब गायकवाड यांनी आरपीआयच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट महाराष्ट्राचे उपाध्यक्ष जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख व अहमदनगर जिल्ह्याचे प्रमुख नेते आणि बुलंद तोफ अशी ओळख असणारे बाळासाहेब गायकवाड यांनी आपल्या प्रभावी वकृत्वाने अनेक सभा गाजविल्या आहेत.
सातत्याने पक्षनिष्ठेवर श्रद्धा ठेवून काम करणाऱ्या बाळासाहेब गायकवाड यांनी पुरोगामी विचार जोपासला आहे. खरे तर आठवले गटाने जातीयवादी शक्तींशी केलेली हात मिळवली हीच त्यांच्या विचारसरणीला मान नव्हती यातून त्यांनी सातत्याने विरोध केला.
या निवेदनात बाळासाहेब गायकवाड यांनी राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्ष असलेल्या महायुतीने लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये आरपीआयच्या कुठल्याही कार्यकर्त्याला उमेदवारी दिली नाही. या अत्यंत दुर्दैवी आहे. हा रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा अपमान असून याच्या निषेधार्थ मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा व माझ्याकडे असलेल्या पक्षीय जबाबदाऱ्यांचा राजीनामा देत आहे.
ही राजीनामा दिल्याची घोषणा बाळासाहेब गायकवाड यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या भव्य सभेत जाहीर केली होती.
दरम्यान त्यांच्यासमवेत आरपीआयचे राज्यभरातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी देणार असल्याने महायुतीला राज्यात मोठा झटका बसला आहे