राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराची पहिली यादी जाहीर
◽बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध पुतणे युगेंद्र पवार यांच्यात थेट लढत होणार
संगमनेर LIVE | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पक्षाच्या उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली.
यामध्ये इस्लामपूर मधून स्वतः जयंत पाटील, काटोला मधून अनिल देशमुख, घनसावंगी मधून राजेश टोपे, कराड उत्तर मधून बाळासाहेब पाटील, मुंब्रा - कळवा मधून जितेंद्र आव्हाड, कोरेगाव मधून शशिकांत शिंदे, बसमत मधून जयप्रकाश दांडेगावकर, जळगाव ग्रामीण मधून गुलाबराव देवकर, इंदापूर मधून हर्षवर्धन पाटील, राहुरी मधून प्राजक्त तनपुरे, शिरुर मधून अशोक पवार,
शिराळा मधून मासिंगराव नाईक, विक्रमगड मधून सुनील भुसारा, कर्जत जामखेड मधून रोहित पवार, अहमदपूर मधून विनायकराव पाटील, सिंदखेडराजा मधून राजेंद्र शिंगणे, उदगीर मधून सुधाकर भालेराव, भोकरदन मधून चंद्रकांत दानवे, तुमसर मधून चरण वाघमारे, किनवट मधून प्रदीप नाईक, जिंतूर मधून विजय भामरे,
केज मधून पृथ्वीराज साठे, बेलापूर मधून संदीप नाईक, वडगाव शेरी मधून बापूसाहेब पठारे, जामनेर मधून दिलीप खोडपे, मुक्ताईनगर मधून रोहिणी खडसे, मूर्तिजापूर मधून सम्राट डोंगरदिवे, नागपूर पूर्व मधून दिनेश्वर पेठे, किरोडा मधून रविकांत गोपचे, अहिरी मधून भाग्यश्री आत्राम, बदनापूर मधून बबलू चौधरी, मुरबाड मधून सुभाष पवार, घाटकोपर पूर्व मधून राखी जाधव, आंबेगाव मधून देवदत्त निकम,
बारामती मधून युगेंद्र पवार आणि कोपरगाव मधून संदीप वर्पे या ४५ जनांना उमेदवारी देण्यात आली आहे.