आमच्या सहनशीहतेला कमजोरी समजू नका - डॉ. सुजय विखे पाटील
◻️ अंभोरे आयोजित केलेल्या सभेत डॉ. विखे पाटील यांच्याकडून “लाव रे तो व्हीडीओ” कॉग्रेसची पोलखोल
◻️ तुमच्या मुलीला न्याय मिळाला पण, गाडीतून ओढून मारहाण केलेल्या आमच्या बहीणीची माफी कोण मागणार?
◻️ तालुक्यातील जनतेने आता परीवर्तनासाठी सज्ज व्हावे
संगमनेर LIVE | संगमनेर तालुका फक्त कुटुंब आहे असे म्हणून चालत नाही, तर जबाबदारी पार पाडावी लागते. आमची सहनशीहता ही कमजोरी समजू नका आता पातळी सोडून बोलाल तर गाठ माझ्याशी आहे. तुमच्या मुलीला न्याय मिळाला पण गाडीतून ओढून मारहाण केलेल्या आमच्या बहीणीची माफी कोण मागणार असा परखड सवाल डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला.
संगमनेर तालुक्यातील अंभोरे आयोजित केलेल्या सभेत डॉ. विखे पाटील यांनी आज “लाव रे तो व्हीडीओ” मधून काॅगेस कार्यकर्त्यांनी गाड्या जाळण्याच्या कृत्याचा घटनाक्रम दाखवून मला मारण्यासाठी आमदारांचे बंधू इंद्रजित थोरात यांनीच हे सर्व कटकारस्थान रचले असल्याचा थेट आरोप केला.
डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यचा निषेध तसेच विखे पाटील कुटूबांच्या वतीने दिलगीरी व्यक्त करून डॉ. विखे पाटील म्हणाले की, जो व्यक्ति बोलला तो आता जेल मध्ये आहे. पण आमच्या सभेसाठी आलेल्या महीलांना मारहाण करणारे काॅगेस कार्यकर्ते उघडपणे तालुक्यात फिरत आहेत. आमची संस्कृती काढून राज्यात बदनामी केली. पण आमच्या मतदार संघात येवून वडीलांबद्दल वाटेल ते बोलता. ज्याची ग्रामपंचायती मध्ये निवडवून यायाची लायकी नाही ते बोलतात आणि या तालुक्याचे आमदार हसतात ही तुमची संस्कृती आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आमच्या तालुक्यात येवून आरोप झाले तरी एक सायकल सुध्दा आम्ही जाळली नाही. आमची सहनशीहता कमजोरी समजू नका आमच्यावर लोकशाही मानण्यचे संस्कार आहेत. मला डोक्यावर पडला म्हणता आता कोण कोणाला पाडतो हेच दाखवतो असा टोलाही त्यांनी लगावला.
विकासावर बोला हे आवाहन त्यांना दिले पण त्यावर ते बोलत नाही. पण केवळ व्यक्तिगत टिका करून वेळ मारून नेली जाते. वडीलांवर बोललो तर, डाॅ. जयश्री ताईना खूप लागले. पण माझ्या वडीलांवर तुम्ही बोलता हे तीन वर्ष आम्ही सहन केले. पण आता पुन्हा बोललात तर माझी कशाचीही तयारी असल्यचा इशारा त्यांनी दिला.
अंधारातून तुम्ही युवक आणि महीलांना मारहाण केली. अरे उजेडात येवून हल्ले करा. गाड्या पाठवता हत्यार घेवून पाठवता तुम्ही तुमच्या तालुक्यातील जनतेवरच हल्ले करता ते कोणी दुसरे नाहीत प्रेमापोटी सभेला आले होते. पण तुम्हाला ते सहन झाले नाही.
या तालुक्यात परीवर्तन घडवायचे असेल तर दडपशाहीच्या विरोधात गावोगावी गनिमावा करून पेटून उठावे लागेल. आज जी आग माझ्या गाडीला लागली ती तुमच्या घरापर्यत येण्यास वेळ लागणार नाही त्यामुळेच परीवर्तन करण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन त्यांनी केले.