जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
◻️ निलेश लंके, भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. सुधीर तांबे, सत्यजित तांबे राहणार उपस्थिती
संगमनेर LIVE | कॉग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात हे उद्या मंगळवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १ वाजता संगमनेर प्रांताधिकारी कार्यालय येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
बाळासाहेब थोरात हे १९८५ पासून संगमनेर तालुक्याचे प्रतिनिधित्व करत आहे. मागील ८ वेळेस ते विक्रमी मताधिक्याने विजयी झाले असून यावेळेस ९ व्या वेळेस विधानसभेचा अर्ज भरणार आहे. सर्वाना सोबत घेऊन सहकार, समाजकारण, शिक्षण, ग्रामीण विकास या सर्व क्षेत्रांमध्ये काम केले आहे.
याचबरोबर राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण अशी विविध महत्त्वाची खाती भूषवताना या सर्व खात्यांना लोकाभिमुख बनवले आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापनेमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला असून काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले आहे. सध्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य असून राज्याच्या महाविकास आघाडीची समन्वयाची जबाबदारी आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे आहे.
संगमनेर तालुक्यातील प्रचाराची जबाबदारी त्याच्या कन्या डॉ. जयश्री थोरात, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सांभाळत आहेत.
बाळासाहेब थोरात हे आपला उमेदवारी अर्ज उद्या मंगळवारी धनत्रयोदशीच्या दिवशी दाखल करणार आहेत. यावेळी खासदार निलेश लंके, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, मा. आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ. प्रभावतीताई घोगरे, डॉ. जयश्रीताई थोरात यांसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आरपीआय व महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान अर्ज भरण्यासाठी संगमनेर तालुक्यातील सर्व युवक, नागरिक, महिला यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कॉग्रेससह महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षांनी केले आहे.