विखे पाटील यांच्या विजयानतंर आश्वी येथील मांचीहिल संकुलात जल्लोष
◻️ विखे पाटील यांचा विजय ऐतिहासिक - ॲड. शाळीग्राम होडगर
◻️ लाडू वाटप, फटाक्यांची आतिषबाजी आणि विजयी घोषणाबाजीने परिसर दुमदुमला
संगमनेर LIVE | महायुतीचे शिर्डी विधानसभा मतदार संघातील महायुतीतील मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ऐतिहासिक विजयाची सभा मांचीहिल संस्थानमध्ये उत्साहात पार पडली. यावेळी मांचीहिल संस्थानचे संस्थापक ॲड. शाळीग्राम होडगर यांच्या प्रमुख उपस्थितीत व विश्वस्त डॉ. शैलेंद्रसिंह होडगर उपस्थित होते. यावेळी संस्थानातील अधिकारी व कार्यकर्त्यानी एकच जल्लोष करत विखे पाटलांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.
संस्थानतर्फे एकमेकांना लाडू भरून व फटाके फोडत आनंद साजरा करण्यात आला. यावेळी विश्वस्त डॉ. शैलेंद्रसिंह होडगर यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानुन विखे पाटील यांना विजयी झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
ॲड. शाळीग्राम होडगर यांनी मागील दोन महिन्यापासून मांचीहिल संस्थानातील ३५० अधिकारी व कर्मचारी यांनी विखे पाटील यांच्या विजयासाठी अहोरात्र केलेल्या कामाचे कौतुक केले. तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांचा विजय हा ऐतिहासिक असून भविष्यात शिर्डी मतदारसंघातील विकासाला नव्या उंचीवर घेऊन जाणार असल्याची भावना व्यक्त केली.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विजय पिसे, उपाध्यक्ष आण्णासाहेब बलमे, संचालिका नीलिमा गुणे, मुख्य लेखापाल राजू बोंद्रे, प्राचार्य मोहन मोरे, प्रशासकिय अधिकारी दत्ता शिंदे व सर्व विभागाचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.