लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांमुळेचं विजयश्री - अमोल खताळ

संगमनेर Live
0
                    छायाचित्र - सचिन ताजणे

लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांमुळेचं विजयश्री - अमोल खताळ

◻️ आमदार अमोल खताळ यांचा कार्यकर्त्याशी संवाद 


संगमनेर LIVE | लाडक्या बहिणी व शेतकऱ्यांमुळेचं आपला विजय सुखर झाला. ४० वर्ष सत्तेचा उपभोग घेत भावी मुख्यमंत्री पदाचे स्वप्न बघणाऱ्यांनी संगमनेर तालुका भकास केला. त्यामुळेचं सामान्य जनतेने व महायुतीच्या कार्यकत्यांनी आपल्याला विधानसेभेत काम करण्याची संधी उपलब्ध करुन दिल्याची भावना संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली.

संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील रविद्र देशमुख यांच्या वस्तीवर कार्यकर्त्याशी संवाद साधताना आमदार अमोल खताळ बोलत होते. रविंद्र देशमुख, ज्ञानेश्वर देशमुख, राजु देशमुख, अशोक देशमुख, पवन कडलग, अशोक देशमुख, पवन कडलग, राजू पवार, पवन हांडे, मनोज देशमुख, वैभव नाईवाडी, कैलास अडभाई यावेळी उपस्थित होते.

आमदार अमोल खताळ पुढे म्हणाले की, मागील आडीच वर्षात महायुती सरकारने सामान्य शेतकऱ्यांसाठी अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले. विज बिल शुन्य केले. तसेच पुढील पाच वर्ष शेतीसाठी लाईट बिल येणार नसल्याने ग्रामीण भागातील शेतकरी हा आंनदी झाला आहे. लवकरच शेतकऱ्यांसाठी शेतासाठी अद्यावत सोलर लाईटच्या माध्यमातु दिवसा शास्वत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.

दरम्यान याप्रसंगी संतोष कडलग, पवन देशमुख, पवन कडलग, राजू पवार, अमोल देशमुख, राहुल वामन, हिरालाल सुर्वे, सुरेश वामन, किशोर कडलग, सुनिल देशमुख, सचिन कडलग, विलास साळवे, सागर कळसकर, मनोज बांगर, राजु जमधाडे, सतिष देशमुख आदी सह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संगमनेर तालुक्यात ४० वर्षाय दडपशाहीचे झाकन आमदार अमोल खताळ यांनी उधाळुन लावले. महायुती सरकार हे शेतकरी कष्टकरी लोकांच्या मागे उभे असुन सामान्य कुटुबांतील शेतकरी युवकाला संगमनेर तालुक्याचे नेतृत्व करणयाची संधी मिळाली असल्याचे मनोगत रविद्र देशमुख यांनी व्यक्त केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !