महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे भारतीय स्त्री शिक्षणाचे प्रणेते - अमोल खताळ
◻️ जवळे कडलग येथील जिल्हा परिषद शाळेत महात्मा फुले यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
संगमनेर LIVE | महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. जोतिरावांनी १८४८ मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. खालच्या समजल्या जाणाऱ्या जातींमधील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केल्याचे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील जिल्हा परीषद शाळेत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करताना आमदार खताळ बोलत होते.
आमदार खताळ पुढे म्हणाले की, शोषित वर्गाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे. त्यांना १८८८ मध्ये महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी सन्माननीय ‘महात्मा’ (संस्कृत: ‘महान आत्मा’, ‘पूज्य’) पदवी प्रदान केली होती. असे म्हटले आहे.
दरम्यान याप्रसंगी रविंद्र देशमुख, सुरेश ढगे, शुभम थोरात, दौलत जोशी, मुख्याध्यपक दत्तात्रय लांडगे, विलास शिरोळे, प्रकाश भागवत, मनीषा देशमुख, रत्नमाला पवार, शोभना जोंधळे, ज्योती कोरडे, मनीषा सुर्वे, अनिता लावरे, राजेद्रं भगत, डॉ. सुरज भगत, दत्त विद्यालयाचे गाडेकर, मांडे, वाकचौरे आदी उपस्थित होते.