ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक ; शिवसेनेतून गद्दाराच्या हकालपट्टीची केली मागणी

संगमनेर Live
0
ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक ; शिवसेनेतून गद्दाराच्या हकालपट्टीची केली मागणी

◻️ माजी शहरप्रमुख अमर कतारी यांच्या शिवसैनिकाना कामाला लागण्याच्या सुचना




संगमनेर LIVE | विधानसभा निवडणूकिच्या धक्कादायक निकालानंतर संगमनेरच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील शिवसैनिकांची चिंतन बैठक आज गुरुवारी संपन्न झाली. त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व विभागीय संपर्क नेते, जिल्हा संपर्क प्रमुख, विधानसभा संपर्क प्रमुख यांचे कडे विविध मागणीची ठराव प्रत पाठवण्यात आली.

यावेळी निष्क्रिय आणि गद्दार पदाधिकारी असा ठपका ठेवून शिंदे गटाच्या आमदारांच्या मिरवणुकीमध्ये नाचत पेढे वाटणारे शहर प्रमुख आप्पा केसेकर, उपशहर प्रमुख बालू पीडीआर, योगेश बिचकर व विधानसभा संघटक कैलास वाकचौरे यांची त्वरित हकालपट्टी करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची महाराष्ट्रात झालेली पीछेहाट व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा झालेला पराभव या सर्व गोष्टीचे आत्मचिंतन करण्यासाठी व पराभावाची कारणे शोधून गद्दारी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यासाठी तसेच झालेला पराभव विसरून नव्या जोमाने पुन्हा जनसेवा करण्यासाठी संगमनेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिवसैनिकांना माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी मार्गदर्शन करत कामाला लागण्याचा सल्ला दिला.

यावेळी झालेल्या बैठकीमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली असून बाळासाहेब थोरात यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी धर्म पाळला परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही गद्दारांनी बाळासाहेब थोरात यांना शब्द देऊनही सहकार्य न करता शिंदे गटाच्या उमेदवाराला कशी मदत होईल हा प्रयत्न केला. यामुळे प्रामाणिक शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झालेला आहे. काही गद्दारांनी शिंदे गटाचे आमदार निवडुण आल्यावर पेढे वाटप करत त्यांचा जाहीर नागरी सत्कार केला. तसेच डीजेच्या तालावर देखील नाचले ही गोष्ट प्रामाणिक शिवसैनिकांच्या पचणी न पडल्यामुळे सर्व शिवसैनिकांनी एकमताने सदर गद्दारांची हकालपट्टी करण्याचा एकमुखी ठराव केला आहे.

तालुकाप्रमुख संजय फड हे अतिशय निष्क्रिय राहिल्यामुळे त्यांना त्वरित पदमुक्त करुन योग्य पदाधिकाऱ्यांची नेमणूक करावी असा ठराव करण्यात आला. तसेच आगामी नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकित काँग्रेसने शिवसेना (उबाठा) पक्षाला निवडणुकीत सन्मानाचा वाटा द्यावा अन्यथा आम्ही स्वबळावर आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवू असा इशारा देखील देण्यात आला.

यावेळी महिला आघाडी तालुकाप्रमुख शितल हासे, उपजिल्हाप्रमुख आशा केदारी, उपतालुकाप्रमुख राजश्री वाकचौरे, रेणुका शिंदे, वैशालीताई वडतले, शहर प्रमुख संगीताताई गायकवाड, उपजिल्हाप्रमुख अशोक सातपुते, उपतालुकाप्रमुख सचिन साळवे, युवा सेना विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, संगमनेर व्यापारी आघाडी शहर प्रमुख संभवशेठ लोढा, उपशहर प्रमुख वेणुगोपाल लाहोटी, वाहतूक सेना शहर प्रमुख इम्तियाज शेख, युवा सेना जिल्हा समन्वयक फैसल सय्यद, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, विभाग प्रमुख अल्ताफ मुमताज, विभाग प्रमुख परवेज शेख, 

उपतालुकाप्रमुख संजय सोनवणे, ग्राहक कक्ष तालुकाप्रमुख सदाशिव हासे, उपतालुकाप्रमुख जना नागरे, लक्ष्मण सोन्नर, युवा सेना शहर प्रमुख गोविंद नागरे, आरोग्य सेना जिल्हाप्रमुख अजिज मोमीन, उप शहर प्रमुख नारायण पवार, युवा सेना तालुका प्रमुख अक्षय गुंजाळ, पठार भाग तालुकाप्रमुख योगेश खेमनर, शिवसेना उपतालुकाप्रमुख एकनाथ खेमनर, युवा सेना उप प्रमुख गुलाब कोकाटे, विभाग प्रमुख कयूम शेख, रहीम बेग, सलमान शेख, शशिकांत घुले, मयूर ढोकरे, विभाग प्रमुख प्रशांत खजुरे, शाखाप्रमुख प्रकाश चोथवे, ज्येष्ठ शिवसैनिक रंगनाथ फटांगरे, त्रिलोक कतारी, पंकज पडवळ, पठार भागातील शिवसैनिक सुनील घुले, 

कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य विजय सातपुते, माजी तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, शिवसेना शहर संघटक पप्पू कानकाटे, ज्येष्ठ शिवसैनिक गणेश धात्रक, आश्वी उपतालुकाप्रमुख प्रकाश गायकवाड, उपतालुकाप्रमुख निलेश गुंजाळ, गटप्रमुख रवी गिरी, शहर समन्वयक असिफ तांबोळी, उपशहर प्रमुख अक्षय गाडे, शिवसेना उपशहर प्रमुख दीपक वनम, युवा सेना उपजिल्हाप्रमुख वैभव रामनाथ अभंग, माजी युवा सेना तालुकाप्रमुख राजू सातपुते, विभाग प्रमुख जयदेव यादव, 

शाखाप्रमुख अनिल खुळे, उपतालुकाप्रमुख गोकुळ लांडगे, दत्तात्रय आहेर, रिक्षा सेना शहर प्रमुख अशोक बडे, रवी बढे, सोमनाथ शेंडे, शिवसेना शहर समन्वयक दीपक साळुंखे, युवा सेना उप तालुका प्रमुख सागर भागवत, ज्येष्ठ शिवसैनिक हरीश लांडगे आदिसह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !