महायुतीकडून मंत्रीपदाची लॉटरी कोणाला लागणार? संभाव्य मंत्र्यांची यादी
संगमनेर LIVE | विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश संपादन केले असून येत्या २ डिसेंबर रोजी महायुती सरकारचे मुख्यमंत्री पदाचा शपध सोहळा पार पडणार असल्याची चर्चा आहे.
एका वृत्तानुसार, मंत्रिमंडळात भाजपला सर्वाधिक २० ते २५ मंत्रिपदं, तर शिंदेंच्या शिवसेनेला १० ते १२ तर, अजित पवार गटाला ७ ते ९ मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार याबाबत एक संभाव्य यादी वायरल झाली आहे.
यामध्ये भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी पुढीलप्रमाणे..
देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
राधाकृष्ण विखे पाटील
गिरीश महाजन
रविंद्र चव्हाण
मंगलप्रभात लोढा
चंद्रशेखर बावनकुळे
आशिष शेलार
नितेश राणे
शिवेंद्रसिंहराजे भोसले
राहुल कुल
माधुरी मिसाळ
संजय कुटे
गणेश नाईक
पंकजा मुंडे
गोपीचंद पडळकर यांची संभाव्य यादीत नावे असू शकतात.
शिवसेनाच्या (शिंदे) संभाव्य मंत्र्यांची यादी पुढीलप्रमाणे..
उदय सामंत
शंभूराज देसाई
गुलाबराव पाटील
संजय शिरसाट
भरत गोगावले
प्रकाश सुर्वे
प्रताप सरनाईक
तानाजी सावंत
राजेश क्षीरसागर
आशिष जैस्वाल
निलेश राणे यांचा संभाव्य यादीत समावेश असू शकतो.
राष्ट्रवादीच्या (अजित पवार) संभाव्य मंत्र्यांची यादी पुढीलप्रमाणे..
अजित पवार
धनंजय मुंडे
छगन भुजबळ
अदिती तटकरे
अनिल पाटील
हसन मुश्रीफ
धर्मराव बाबा अत्राम यांची मंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.