उंबरी बाळापूर येथे इयत्ता १० वी च्या माजी विद्यार्थ्याचा १८ वर्षानी पुन्हा भरला वर्ग!
◻️ स्नेह सम्मेलनानिमित्त माजी विद्यार्थ्याकडून शैक्षणिक वर्गाला सिलिंग पंखे भेट
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयातील सन २००५-०६ च्या बॅचचे इयत्ता दहावीतील विद्यार्थीचा शिक्षकांच्या उपस्थितीत स्नेहमेळावा नुकताचं पार पडला असून यावेळी उपस्थित राहिलेल्या माजी विद्यार्थ्याचा आनंद ओसंडून वाहत होता. त्यामुळे १८ वर्षानी पुन्हा १० वी च्या वर्गात बसण्याचा मोह या माजी विद्यार्थ्याना आवरता आला नाही.
तब्बल १८ वर्षानंतर सर्व वर्गमित्र एकत्रित आल्याने काही काळासाठी शाळेतील वातावरण भारावून गेले होते. तत्कालीन दहावीच्या वर्गातील विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. या स्नेह मेळाव्यानिमित्त त्यांना एकत्र ऐण्याचा योग जुळून आल्यामुळे त्यांच्याकडून जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यामुळे या माजी विद्यार्थ्याना गहिवरून आले.
यावेळी प्रवरेचे जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षक जयराम काशीद, माधव घोलप, मनोज सकळकर, महेश बाम्हणे, सर्जीराव गायकवाड, माणिकराव गायकवाड, दिलीप आहेर, प्रकाश गाडेकर, ज्ञानेश्वर जोंधळे, सोमनाथ तुपे, नामदेव तांबे, शिक्षक गिरी, माजी शिपाई संजय कोरडे, भालचंद्र मुन्तोडे तसेच स्थानिक शिक्षक संजय उंबरकर यांच्यासह या स्नेह मेळाव्याचे आयोजक व माजी विद्यार्थी संग्राम शेळके, प्रकाश उंबरकर, राहुल कै. सारबंदे, विवेक डोखे, रुपाली भुसाळ, योगिता खेमनर, रुपाली चौधरी, अर्चना सारबंदे, राणी निर्मळ, ताई भुसाळ, शिला शेळके, अनिल उंबरकर, राजश्री शेरमाळे, आशा सारबंदे, निलेश भुसाळ, स्वाती सारबंदे, दत्ता काळे, ज्योती भुसाळ, सचिन शेळके, श्रीकांत भुसाळ, राजश्री उंबरकर, अर्चना गाडेकर, उमेश सांबरे, सुनिता सारबंदे, बाळासाहेब भुसाळ, नितीन घोलप, रोहिणी डोखे, राहुल बा. सारबंदे, भगवान बाम्हणे, रुपाली डोखे, जयश्री बढे, निलेश वाघमारे, दिपाली डोखे, दिनेश शिखरे, सुनिता भुसाळ, अमोल सांरबदे, ऋषिकेश सांबरे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित शिक्षकानी भारावलेल्या स्थितित मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. तसेच माजी विद्यार्थी प्रकाश उंबरकर, नितीन भुसाळ, रुपाली भुसाळ, विवेक डोखे यांनी देखील आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. याप्रसंगी माजी विद्यार्थ्याची उपस्थिती लक्षणीय होती. या सुंदर कार्यक्रामाचे सूत्रसंचालन शिक्षक नितीन पावडे यांनी केले.
दरम्यान अनेक वर्षानंतर एकमेकांना भेटल्याने भेटीच्या आनंदासोबत आठवणींच्या दुनियेत रममान होताना या माजी विद्यार्थ्याना डोळ्यांतून डोकावणारे अश्रू थोपविता आले नाहीत. तसेच याप्रसंगी शाळेतील शैक्षणिक वर्गास सिलिंग पंखा भेट स्वरुपात देण्यात आला. त्याचा स्विकार स्थानिक स्कुल कमेटी अध्यक्ष रामभाऊ भुसाळ यांनी केला.
याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या स्नेह भोजनाचा आस्वाद उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांनी घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थ्यानसह ग्रामपंचायत व शाळेने विशेष परिश्रम घेतले.