मुलभूत गरजेपासून वंचित ठेवणाऱ्यांना धडा शिकवा - अमोल खताळ

संगमनेर Live
0
मुलभूत गरजेपासून वंचित ठेवणाऱ्यांना धडा शिकवा - अमोल खताळ

◻️ महायुतीचे उमेदवाराच्या निमोण, तळेगाव प्रचार दौऱ्याला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

◻️ मालदाडच्या सेवानिवृत्त शिक्षकाने दिले निवडणुकीसाठी ११ हजार..

संगमनेर LIVE | तळेगाव निमोण परिसराला भोजापुरचे पाणी माजी मंत्री स्व. बी. जे. खताळ यांच्या माध्यमातून मिळाले आहे. मात्र गेली ४० वर्षे ज्यांनी या तालुक्याची सत्ता भोगली त्यांनीच खऱ्या अर्थाने या निमोण, तळेगाव परिसरातील  जनतेला पाण्यापासून वंचित ठेवले. त्यामुळे नागरिकांना मुलभूत गरजापासून वंचित ठेवणाऱ्यांना या निवडणुकीत धडा शिकवा असे आवाहन उमेदवार अमोल खताळ यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील निमोण गटात येणाऱ्या समनापुर, सुकेवाडी, कुरण, खांजापुर, मालदाड, सोनोशी, नान्नज दुमाला, पारेगाव बु।, कऱ्हे, पळसखेडे, निमोण, पिंपळे, चिंचोली गुरव, देवकवठे, काकडवाडी, पारेगाव खुर्द, पोखरी हवेली आदी गावातील मतदारांच्या महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी भेटी घेतल्या. त्यानंतर निमोण येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत ते बोलत होते.

या सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते विष्णू घुगे होते. याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते सुदाम सानप, दादाभाऊ गुंजाळ, भीमराज चत्तर, मारुती घुगे, शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश काळे, निमोण सरपंच संदीप देशमुख, माजी उपसरपंच साहेबराव आंधळे, भाजप युवा नेते श्रीकांत गोमासे, किसन चत्तर, हरिशचंद्र चकोर, भाजप नेते गोरक्षनाथ कांडेकर, संपत फड, गोरख मंडलीक, मंगेश वालझडे, भाजप महिला तालुकाध्यक्ष कविता पाटील, बाबा आहेर, लहानू नवले, कासारेंचे सरपंच नवनाथ कानकाटे, मालदाडचे जेष्ठ नागरिक माधव नवले, रोहिदास नवले, गोरक्ष नवले, अजय नवले, उत्तम नवले, भाऊसाहेब नवले, सोनेवाडीचे आनंदा गोमासे, पळसखेडेचे ज्येष्ठ नेते गंगाधर कांडेकर, प्रदीप कांडेकर, दिपक वाघ, कऱ्हेचे तुषार सानप, गोरक्ष सानप, नवनाथ सानप, अर्जुन कोटकर आदी उपस्थित होते.

अमोल खताळ पुढे म्हणाले की, दुष्काळी समजल्या जाणाऱ्या तळेगाव, निमोण परिसराला  पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यापासून कायमच वंचित ठेवले आहे. त्यामुळे आता तालुक्यातील सर्व जनतेने परिवर्तन करायचे ठरविलेले आहे. तुम्ही ज्यांना चाळीस वर्षे दिले त्यांनी तुमचा पाण्याचा प्रश्न सोडवला नाही तर आत्तापर्यंत भोजापुर आणि निळवंडेच्या नावाखाली तुमची फक्त फसवणूक केली आहे. त्यामुळे मला फक्त पाच वर्षे संधी द्या, मी या भागातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न महायुती सरकारच्या माध्यमातून सोडविल्याशिवाय राहणार नाही. जर या भागातील पाण्याचा प्रश्न मी सोडविला नाही तर मी या निमोन, तळेगाव भागात फिरकणार सुद्धा नाही. अशी ग्वाही खताळ यांनी उपस्थित जनतेला दिली.

मालदाडच्या सेवानिवृत्त शिक्षकाने दिले निवडणुकीसाठी ११ हजार..

संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधून लाडक्या बहिणींना मिळालेल्या पैशातून डोळसणे, कासारे येथील महिलांनी मदत केली. तर निमोण येथील सभेत लाडक्या बहिणींनी आपल्या ऐपतीप्रमाणे कोणी शंभर, दोनशे, पाचशे असे करत उमेदवार अमोल खताळ यांना निवडणुक खर्चासाठी मदत केली. तसेच मालदाड येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळासाहेब मारुती नवले यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश तर निमोणचे भाजप ज्येष्ठ नेते मारुती घुगे यांनी सुद्धा उमेदवार खताळ यांना  निवडणूक खर्चासाठी मदत करत आपणच ही निवडणूक आता हातात घेतली असल्याचे दाखवून दिले आहे.

अदृश्य हात माझ्या बरोबर..

संगमनेर तालुक्यातील विविध सहकारी संस्थांमध्ये काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा माझ्या पाठीमागे अदृश्य स्वरूपात हात आहे. याचा प्रत्यय मतदानाच्या रूपाने नक्कीच दिसून येईल. त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास उमेदवार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !