डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयात ‘रक्तदान शिबिर’ संपन्न

संगमनेर Live
0
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयात ‘रक्तदान शिबिर’ संपन्न

◻️ भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनर्वाण दिनानिमित्त विळदघाट येथे आयोजन 

संगमनेर LIVE (नगर) | डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी  महाविद्यालय, विळदघाट येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनर्वाण दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेचे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. 'रक्तदान करून अनेकांना जीवदान देऊ या' हा संकल्प सर्वांनी करूया असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर धोंडे यांनी करून 'रक्तदान हेच जीवनदान' असे प्रतिपादन केले. 

हे शिबिर डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे कृषी महाविद्यालय आणि डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाले.

याप्रसंगी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन विळदघाटचे उपसंचालक (तांत्रिक) प्रा. डॉ. सुनिल कल्हापुरे, डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्या डॉ. चैत्राली बट्टाड, डॉ. ओंकार, डॉ. संकेत, गौतम सगलगिले, संदीप आयनार, रक्तपेढीचे तांत्रिक अधिकारी रुचिका गुळावे, श्रेयस ढेपे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर धोंडे, उपप्राचार्य डॉ. एस. बी. राऊत, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण दांगडे यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेत्तर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.

यावेळी बोलताना महाविद्यालयाचे डॉ. मधुकर धोंडे यांनी सांगितले की, दरवर्षी राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत विविध उपक्रम राबवले जातात. त्यापैकी रक्तदान शिबिर हा अतिशय स्तुत्य उपक्रम देखील राबवला जातो. रक्तदान शिबिरातून स्वेच्छेने केलेले रक्तदान कोणालातरी उपयोगी पडते व त्यामुळे कोणाचे तरी प्राण वाचू शकतात. 

दरम्यान या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून ३५ बॅग रक्त संकलन करता आले, याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन धन्यवाद दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्वयंसेवक कोमल जगताप व आभार निकिता शिंदे यांनी मानले.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !