महायुतीचे सरकार हे सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या पाठीशी - निलमताई खताळ
◻️ खांबे येथे सौ. खताळ यांनी भेट देऊन विक्रमी मताधिक्य दिल्यामुळे ग्रामस्थांचे मानले आभार
◻️ चंपाषष्ठीनिमित्त खंडोबा व मार्तड भैरवनाथाचे घेतले मनोभावे दर्शन
संगमनेर LIVE (आश्वी) | भारत हा कृषिप्रधान देश असुन देशाची तसेच महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती या क्षेत्रावर अवलंबून आहे. भारतातील ७० टक्क्याहुन अधिक लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. महाराष्ट्राचा शहरी भाग सोडला तर उर्वरीत महाराष्ट्रात शेती हाच महत्वाचा व्यवसाय असल्याचे आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलमताई खताळ यांनी म्हटले.
संगमनेर तालुक्यातील खांबे येथील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान येथे मार्घशीर्ष शुध्द चंपाषष्ठी स्कंदषष्ठी मार्तडभैरव देवस्थान भेट प्रसंगी सौ. खताळ बोलत होत्या. यावेळी सरपंच रवींद्र दातीर, ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब खेमनर, रऊफ शेख महायुतीचे कार्येकते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
सौ. खताळ पुढे म्हणाल्या की, महायुतीचे सरकार हे सामान्य शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. विधानसभा निवडणुकीत खांबे गावाने उच्चांकी मते देऊन सामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना संगमनेर विधानसभेचे नेतृत्व करण्याची संधी दिली. याबद्दल खांबे गावतील ग्राम दैवत खंडोबा महाराज यांचे आर्शीवाद घेऊन महायुती सरकारवर कृपा दृष्टी राहावी यासाठी साकडे घालण्यासाठी मी आले आहे. असे सौ. खताळ म्हणाल्या.
तालुक्यातील ग्रामीण भागातील सामान्य जमता अमोल खताळ यांच्या पाठीशी उभी राहील्यामुळे संगमनेर विधानसभेतील विजयाची नोंद झाली. खांबे हे गाव महायुती सरकार आणि आमदार अमोल खताळ यांच्या सोबतच विकास गंगा ग्रामीण भागत आणण्यासाठी बरोबर असणार असल्याची ग्वाही खांबेचे सरपंच रविंद्र दातीर यांनी यावेळी दिली.